Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आई, ताई, बाबा, भाऊ, आजी-आजोबा मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही सदृढ करा !

नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणुक विभाग यांच्या निर्देशानूसार नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा

राहुरी फॅक्टरीजवळील अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण

नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणुक विभाग यांच्या निर्देशानूसार नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा ग्रंथालय कार्यालय, डॉ. ना.ज. पाऊलबुध्दे विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व साई श्रध्दा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.  
वसंत टेकडी येथील डॉ. ना.ज. पाऊलबुध्दे विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह धरण्याची शपथ देण्यात आली. तर महाविद्यालयीन युवक-युवतींनी देखील मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प केला. यावेळी पाऊलबुध्दे विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस. बिडवे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, साई श्रध्दा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परकाळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रा. आशा गावडे, प्रा. रोहिदास चौरे, विनायक सापा, दिपक परदेशी, वैशाली शिर्के, लक्ष्मी चौरे, सुजाता दरे, अर्चना यंगळदास, वैशाली बूचकुळ, रावसाहेब पाखरे, प्रतिभा डोंगरे-खोडदे, सायंबर आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, धर्मनिरपेक्षपणे, प्रलोभनाला बळी न पडता व भिती न बाळगता केलेल्या मतदानाने लोकशाही सदृढ होणार आहे. सदृढ लोकशाहीसाठी चांगले उमेदवार निवडून येण्याची गरज असून, प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्‍यक आहे. मतदानाची कमी असलेल्या टक्केवारीतून योग्य व जनमतामधून उमेदवार निवडला जात नाही. यासाठी प्रत्येकाने कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजाविण्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक बी.एस. बिडवे यांनी मतदानाचे महत्त्व सांगून उपस्थितांना मतदानाचे हक्क बजावण्याची व कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मतदानाचा आग्रह धरण्याची शपथ दिली. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणुक अधिकारी राहुल पाटील, प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS