Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी तरुणास कोलदांडा घालून बेदम मारहाण ;राहाता तालुक्यातील घटना

राहाता : राहाता तालुक्यातील केलवड गावात एका आदिवासी समाजाच्या तरुणास बेदम मारहाण करून कोलदांडा घालून बांधून ठेवल्याची खळबळ जनक घटना घडली आहे याप्

कोपरगावमध्ये शहरात फटाके वाजविण्यावरून मारहाण
तुकाराम भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
नगर शहराची पाण्याची चिंता मिटणार… ५० लाख लिटरची नवीन टाकी होणार कार्यान्वित LokNews24

राहाता : राहाता तालुक्यातील केलवड गावात एका आदिवासी समाजाच्या तरुणास बेदम मारहाण करून कोलदांडा घालून बांधून ठेवल्याची खळबळ जनक घटना घडली आहे याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे जखमी आदिवासी तरुणावर अ नगर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते दरम्यान या घटनेत परस्पर विरोधी गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत.
याबाबत आदिवासी पिडीत तरुण राहुल बाळू पवार वय 21 वर्ष याने पोलिसात फिर्यादीत म्हंटले आहे की शिर्डी येथील काम आटोपून मी दुपारी एक वाजेच्या सुमारास एम एस 17 सी झेड 75 91 या मोटरसायकल वरून कोराळे केळवड बायपास रोड कडून नांदुरखी रोडने बापू डांगे यांचे माळाकडे जात असताना बायपास रोडवर एक अनोळखी मुलगा भेटला व मला इनामदार यांचे मळ्याजवळ सोड असे म्हटला मी त्यास मोटारसायकलवर बसून इनामदार यांची शेताकडे दुपारी पावणेदान वाजेच्या सुमारास सोडले. तेव्हा संबंधित व्यक्तीने शेतात मेंढ्या चालणार्‍या बाईस हातवारे करून तिला बोलवले यावेळी लगेच मोटरसायकलवर एक माणूस माझे जवळ आला व माझ्या बायकोला हातवरे करून का बोलवत आहे, असे म्हणाला असता माझ्यासोबत चा अनोळखी इसम तिथून पळून गेला. तेव्हा तो माझ्याकडे विचारपूस करीत असताना मी त्याच त्याचे नाव विचारले त्यांनी त्याचे नाव सोमनाथ गमे असल्याची सांगितले व माझी कॉलर धरून त्याने मला इनामदार यांचे शेतात ओढत घेऊन गेला. मला दोरीने बांधून टाकले व मला त्याच्या हातातील लाकडी काठीने मारहाण केली. तेथे त्याची पत्नी आली व मला म्हणाली की तू मला हातवारे करून का बोलत होतास असे म्हणून तिने तोंडात हाताने मारले, त्यानंतर सोमनाथ याने त्याचे दोन भाऊ यांना फोन करून बोलावून घेतले त्यांनी मला शिवीगाळ करून लाकडी दांडा घेऊन त्या दांड्याने मला मारहाण केली. तेथे पडलेला दगड उचलून दगडाने सुद्धा मारहाण करण्यात आली. त्यानंतर माझ्या घरच्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने फोन करून तुमच्या मुलाला इनामदार यांचे शेतात मारहाण करीत आहे असे सांगितले, लगेच तेथे माझे भाऊ आकाश बाळू पवार आई ताराबाई मावशी अनिता व संगीता तसेच माझ्या मावशीचा मुलगा सुरेश मामा साहेबराव माळी असे सदर ठिकाणी त्या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांनी मला सोडवले व पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यानंतर मला उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा संस्थान च्या दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. तर याच घटनेत दुसरी फिर्याद 38 वर्षीय महिलेने दिली आहे. त्यात फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही कोराळे हद्दीतील इनामदार यांचे शेतात मेंढ्या चालण्यास घेऊन गेलो होतो व तेथेच राहत होतो पाच दिवसापासून मोटरसायकल वरून दोन्ही सम आम्ही मेंढ्या सारत असलेल्या शेतात येत होते. त्यातील एक मला हातवारे करून बोलत होता परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. रविवारी 27 ऑक्टोबर रोजी बारा वाजेच्या सुमारास हे दोन मुले नेहमीप्रमाणे आले व त्यातील एका मुलाने मला हातवारे केले व तो माझे जवळून माझा उजवा हात धरून मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करू लागला तेव्हा मी त्याचा हात झटकला मी आरडा ओरड केली असता तेथे बाजूला असणारे शेतकरी आले तेव्हा त्यातील एक जण तेथून पळून गेला व माझे छेडछाड करणारे मुलाला त्यांनी पकडले त्यानंतर कोणीतरी माझे पती यांना फोन केल्याने पती आले व त्यांचे कडेच विचारपूस करू लागले तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले त्यानंतर त्यास त्यांनी त्याला बांधून ठेवले त्याची विचारपूस केली असता त्याने नाव सांगितले व दहेगाव येथील राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पतीने नातेवाईकांना बोलून घेतले. त्यावेळी आरोपीच्या नातेवाईक यांनी काही एक ऐकून न घेता अनिता ठाकूर हीने तेथे पडलेला विळा उचलून माझ्या डोक्यात मारून मला जखमी केले. व आकाश पवार यांनी हातातील लोखंडी गजाने माझे नातेवाईक सोमनाथ निवृत्ती यांना मारहाण केली. तसेच सुदेश ठाकूर यांनी लाथा बुक्क्यांनी आम्हाला सर्वांना मारहाण करून शिवीगाळ केली. दिराला लंगड्या म्हणून त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आम्ही आरडाओरडा केला असता आजूबाजूची लोक जमा होऊ लागल्याने व सर्वजण त्या ठिकाणाहून निघून गेले त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद दिली आहे या घटनेप्रकरणी सोमनाथ निवत्ती गमे, भाऊनाथ निवत्ती गमे, संजय निवत्ती गमे,जिजाबाई सोमनाथ गमे सर्व रा केलवड ता राहाता यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 118(2), 126(2),115(2),352 आधी कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे करत आहे.

COMMENTS