Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीत निशिकांत भोसले-पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार : केदार पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार निशिकांत भोसले-पाटील हे मंगळवार, दि. 29 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रव

तरडगाव येथे मातेकडून चिमुकल्याचा खून
फलटण येथील बांधकाम व्यावसायिकावर खूनी हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा
कराड-विटा मार्गावर दुचाकीच्या स्फोटाने खळबळ

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार निशिकांत भोसले-पाटील हे मंगळवार, दि. 29 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी भाजपाचे इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, धैर्यशील मोरे, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष तैसीन आत्तार, भाजपा इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोकराव खोत, शहर उपाध्यक्ष भास्कर मोरे, दलित महासंघाचे विजय चांदणे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस विरेंद्र राजमाने यांची प्रमुख उपस्थित होती.
केदार पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खर्‍या अर्थाने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला, रुजवला आहे. विविध योजना राबवून समृध्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांच्या बरोबर आहे. निशिकांत भोसले-पाटील यांच्या रूपाने अजितदादांना इस्लामपूर विधानसभा मतदार संघात एक तगडा उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक असणार आहे. आम्हा सर्वांना खात्री आहे. महायुतीतर्फे निशिकांत पाटील विजयी होतील.
निशिकांतदादा हे मंगळवार, दि. 29 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य, जिल्हा व तालुक्यातील महायुतीचे नेते उपस्थितीत राहणार आहेत. मंगळवारी दुपारी 1 वाजता वाळवा पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीस सुरवात होईल. शहरातील झरी नाका, आझाद चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफीस या मुख्य मार्गावरून रॅली निघून तहसील चौकात येईल. याठिकाणी अजितदादादांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींच्या हस्ते निशिकांतदादांचा अर्ज दाखल केला जाईल. त्यानंतर रॅली कोर्ट इमारत या मुख्य मार्गावरून निघून ती ताकारी रोडवरील खुल्या नाट्यगृहाजवळ येईल. येथे रॅलीचे सभेत रूपांतर होईल. यावेळी विविध पक्षात असणार्‍या पदाधिकार्‍यांचा पक्ष प्रवेश अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत होईल. तरी महायुतीचे अधिकृत उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
यावेळी अजित पाटील, अक्षय भोसले-पाटील, संजय पाटील, सयाजी पवार, सयाजी जाधव, अ‍ॅड. उमेश कोळेकर, बापू पाटील, सतीश जाधव, अक्षय कोळेकर, दादासाहेब पाटील, मन्सूर मोमीन, विजय बल्लाळ, महेश पाटील, आप्पा पाटील, निलेश कांबळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रा. दत्तात्रय पाटील, रणजित पाटील, विश्‍वजीत पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS