Homeताज्या बातम्यादेश

‘दाना’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ ’दाना’ गुरुवारी रात्री साडेबारा वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. केंद्रपारा जिल्ह्य

नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई
सत्र न्यायाधीशांच्या विरुद्ध सरन्यायमूर्तींकडे तक्रार
कोकणात मंत्रिमंडळ बैठकीची आवश्यकता

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ ’दाना’ गुरुवारी रात्री साडेबारा वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. केंद्रपारा जिल्ह्यातील भितरकनिका आणि भद्रक जिल्ह्यातील धामरा दरम्यान ते सुमारे 110 किमी प्रतितास वेगाने पोहोचले. ओडिशामध्ये दाना चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. भद्रक जिल्ह्यात जोरदार वारे वाहत असून बांसडा येथे मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी पहाटे चक्रीवादळाचा तडाखा सुरूच राहिल्याने अनेक झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

COMMENTS