दख्खनची राणी ९२ व्या वर्षात पदार्पण करणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दख्खनची राणी ९२ व्या वर्षात पदार्पण करणार

पुणे-मुंबईदरम्यान दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणी (डेक्कन क्वीन) उद्या, मंगळवारी (१ जून) ९२ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.

40 रुपये किलो चा कांदा झाला 2 रुपये किलो| LOKNews24
सौरऊर्जा पथदिवे काळाची गरज : मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर
परदेशातून आलेल्यांची घरी जाऊन तपासणी | DAINIK LOKMNTHAN

पुणे : पुणे-मुंबईदरम्यान दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणी (डेक्कन क्वीन) उद्या, मंगळवारी (१ जून) ९२ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. करोनामुळे यंदाही डेक्कन क्वीन मुंबईतील यार्डातच असली, तरीही वाढदिवसाची परंपरा खंडित होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

    रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने पुणे रेल्वे स्थानक येथे उद्या, एक जूनला वाढदिवस साजरा केला जाणार आहे. पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून १९३० रोजी डेक्कन क्वीनची सेवा सुरू करण्यात आली. त्याला आता ९१ वर्षे पूर्ण झाली आहे. ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने पहिली ‘लक्झरिअस सेवा’ म्हणून पुणे-मुंबई मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरू केली होती. महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसी, ‘पॅलेस ऑन व्हील्स’ यांसारख्या महागड्या गाड्यांमध्ये असलेल्या अनोख्या ‘डायनिंग कार’चा डेक्कन क्वीनमध्ये समावेश आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनला इतर इंटरसिटी गाड्यांपेक्षा वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दर वर्षी एक जूनला ही गाडी मुंबईला रवाना होण्यापूर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप आणि पुणे ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या थाटात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. नेहमीचे प्रवासी गाडीची अंतर्बाह्य सजावट करतात. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे रेल्वेची सेवा बंद होती. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकात प्रतिकात्मक वाढदिवस साजरा केला होता. त्याचप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा करणार असल्याचे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी नमूद केले.

COMMENTS