Homeताज्या बातम्यादेश

भारत-चीनमधील सीमावाद येणार संपुष्टात

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. मात्र, हा वाद आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, आ

नाशिकच्या दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
बापाने पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा केला प्रयत्न
चुरशीची ठरणार राष्ट्रपती पदाची निवडणूक !

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. मात्र, हा वाद आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अर्थात सीमारेषेवर पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी भारत आणि चीनने नवीन करार केला आहे. हा करार डेमचोक आणि डेपसांग भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. सोमवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौर्‍यापूर्वी 22-23 ऑक्टोबर रोजी होणार्‍या 16 व्या ब्रिक्स परिषदेसाठी ही महत्त्वाची घडामोड आहे.
ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चेच्या शक्यतेवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, ’गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. एलएसी मुद्द्यांवर आमचा चीनशी करार आहे. सैन्य मागे घेण्यासाठी आणि परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. द्विपक्षीय चर्चेच्या मुद्द्यावर आम्ही अजूनही वेळ आणि वचनबद्धतेनुसार काम करत आहोत.’ दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्यासाठी करार झाला आहे. मिसरी म्हणाले की, ’गस्तीबाबतच्या करारानंतर दोन्ही देशांमधील एलएसीवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्या सोडवण्यासाठी भारतीय आणि चिनी वाटाघाटी गेल्या काही आठवड्यांपासून सुरू पर्कात आहे.

COMMENTS