Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांमुळे सातारा शहरातील टँकरवाल्यांची दिवाळी सुरु

सातारा / प्रतिनिधी : नियमितपणे दुरुस्तीची कामे करण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने सातारा शहरातील विसावा न

देशात महागाई आणि बेरोजगारीचा उच्चांक
कार्यक्षेत्रातील ऊस सोडून इतरत्र टोळ्यांची हलवा-हलवी थांबवा; अन्यथा आंदोलन; कारखानदारांना स्वाभिमानाचा इशारा
स्वाभिमानीने कराड-वाळवा तालुक्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

सातारा / प्रतिनिधी : नियमितपणे दुरुस्तीची कामे करण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने सातारा शहरातील विसावा नाका येथील दोन दाबनलिका फुटल्या. या प्रकारामुळे शाहूनगर, सदरबझार, दौलतनगर, पिरवाडी आदी भागांतील पाणीपुरवठा सात दिवसापासून बंद आहे. अधिकार्‍यांच्या मते पाईप जोडण्याचे काम वेगाने सुरु असून लवकरच हे काम पूर्ण होईल. मात्र, जनतेला रस्ते, विज, पाणी या मुलभूत गरज पुरवण्यास असमर्थ ठरणार्‍या अस्थापनांना जाब कोण विचारणार? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, चार भिंतीच्या डोंगरावर टाकी बांधताना प्राधिकरणाने केलेली पाईपलाईप गेल्या चार वर्षापूर्वी फुटली होती. त्या वेळेलाही सुमारे 10 दिवस पाणी पुरवठा बंद होता. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत टँकर लॉबीची मिलिभगत झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या आठ दिवसापासून टँकरवाल्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी सुरु झाली आहे. तर या घटनेत सामान्य जनतेचे दिवाळ निघाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागात दुष्काळासारखे संकट वगळता अशी बिकट परिस्थिती कधीही येत नाही. पण ऐतिहासिक वारसा असलेल्या सातारा शहरातील जनतेला मात्र अधिकार्‍यांच्या डोळझाक वृत्तीमुळे वेटीस धरले जात आहे. याचा फटका विधानसभेसह सातारा नगरपालिकेच्या मतदानावर का होणार नाही.
सातारा शहरातील शाहूनगर, सदरबझार, दौलतनगर, पिरवाडी, जुना आरटीओ चौक परिसरात प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात आहे.या भागासाठी पाणीपुरवठा करणार्‍या दाबनलिकेचा गळती लागली आहे. त्यामुळे शनिवारपासून शाहूनगरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दाबनलिकेची दुरुस्ती करण्याचे काम सोमवारपासून दोनदा करण्यात आले. मात्र, समाधानकारक कमिशन मिळत नसल्याने दर्जेदार काम करणार्‍या कंत्राटदारांना अधिकार्‍यांनी दूर ठेवले असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळ गळती काढण्यास अधिकार्‍यांना यश आले नाही. पाईपलाईन अत्यंत जुन्या असल्याची कारणे आता अधिकारी देऊ लागले आहेत. जुन्या पाईप असल्याने गळती काढण्यात अडचण येत असल्याचेही जाहीर करून मोकळे झाले आहेत. सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ झालेली असल्याने सातारा नगरपालिकेच्याही व्यवस्थापनाने या समस्येकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. या समस्येकडे पालिकेने गांभिर्याने न पाहिल्यास शहर स्वच्छता अभियान राबवण्याची वेळ येईल. तसेच त्यामुळे परिसरात साथरोगांचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
घरांतील पाणी संपल्याने लोकांना खाजगी टँकरला पैसे मोजावे लागत आहेत. मागणी वाढल्याने टँकरद्वारेही पुरेशा पाणी पुरवठा करताना अडचण येत आहे. शनिवारी पाईप जोडण्याचे काम पूर्ण होऊन रविवारी रात्री कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी अपेक्षा अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS