Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्र निवडणूकीचा दिशादर्शक बिंदू!

 महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची अधिसूचना मंगळवारी जारी होईल. तत्पूर्वी, उद्यापर्यंत जागांच वाटप बहुधा इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी या

तर, जगात शांतता अशक्य…..! 
सभागृहाचे गांभीर्य नष्ट होतेय का ! 
अहिल्या नव्हे, अहल्यादेवी होळकर ! 

 महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची अधिसूचना मंगळवारी जारी होईल. तत्पूर्वी, उद्यापर्यंत जागांच वाटप बहुधा इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी यांच्या घटक पक्षांत अंतिम टप्प्यात होईल. हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील लढती मात्र बहुरंगी असणार, यात आता कोणतीही शंका राहिली नाही. महायुती मधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, यांचा गट एका बाजूला, तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे तीन पक्ष एका बाजूला यात या दोन्ही आघाड्यांना आता महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून संबोधले जात आहे. परंतु, या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, ज्यांची शक्ती ही आहे. परंतु, त्या पक्षांना कुठल्याही प्रकारे जागा वाटपामध्ये सामील करून घेत नसल्याचा सूर आता उमटू लागला आहे. आंबेडकरवादी, समाजवादी आणि डावे राजकीय पक्ष यांनी काँग्रेसला घेरायला सुरुवात केली आहे. अर्थात, काँग्रेस कडूनच जवळपास सगळ्याच पक्षांना अपेक्षा आहे की, आम्हाला समाधानकारक जागा मिळतील. अर्थात, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे पक्षाचे महाविकास आघाडीचे घटक लोकसभेला राहिले. त्यांना समाधानकारक जागा महाविकास आघाडीने दिल्या नाहीत, तर, यातील छोटे छोटे घटक दल निश्चितपणे बाहेर पडतील आणि त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या निकालांवर निश्चित होईल! दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर दर दिवशी निशाणा साधायला सुरुवात केली आहे. त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती कशी तुटली, या गोष्टीही आता प्रसार माध्यमांवर सांगायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांना घेरत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते काँग्रेसलाही लपेटून घेत आहेत! कारण, शरद पवार यांचे उदाहरण देऊन त्यांनी १९८८-९० ते  कॅलिफोर्नियाला गेल्याचे सांगत यांना तत्कालीन केंद्र सरकारची परवानगी होती का, असा सूर लावला आहे. त्या काळात  काँग्रेस सरकार स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्वात होतं आणि हा आरोप करून ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांनाही घेरण्याची तयारी केली आहे. अर्थात, कोणत्याही निवडणुका आल्या की, शरद पवार यांच्यावर दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असल्याचे आरोप होतच असतात. अशा आरोपांमध्ये गांभीर्य किती आणि राजकारण किती, हीच बाब प्रेक्षक किंवा जनता खास करून पाहत असते. शरद पवार हे या वयात देखील महाराष्ट्राच्या राजकारणात आव्हान आहेत. हे खरे तर त्यांच्या राजकीय यशाचं गमक आहे. वयाच्या नवव्या दशकात त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू असताना, त्यांनी महाराष्ट्रा समोर निर्माण केलेले आवाहन आणि महाराष्ट्राला सत्ता बदलाचे दिलेलं आश्वासन, निश्चितपणे कोणत्याही राजकीय नेत्याला प्रेरणादायी वाटावं असेच आहे. त्यांच्याशी मतभेद निश्चितपणे आहेत, असतील! त्यांचं राजकारण वेगवेगळ्या डावपेचांनी युक्त आहे. असे असलं तरीही वयाच्या ८४ व्या वर्षी राजकारणात एक नेता म्हणून आव्हान असणं, ही बाब अतिशय मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यावर या काळामध्ये मुख्य टीका करावी लागते, यातच राजकीय पक्षांना खरं आव्हान कुणाचं आहे, याची झलक दिसते. महाराष्ट्राच्या पटलावर आता एका बाजूला मराठा आरक्षण आंदोलन, दुसऱ्या बाजूला ओबीसींचे आरक्षण बचाव आंदोलन आणि तिसऱ्या बाजूला एससी, एसटीचे उपवर्गीकरणाच्या संदर्भातले विरोधाचे आंदोलन, अशा या पार्श्वभूमीवर निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे सरकारने ज्या ज्या गोष्टी अंतिम टप्प्यात केल्या आहेत; त्याविषयी अजूनही जनतेच्या मनात विश्वास निर्माण झालेला नाही. कारण, या गोष्टी केवळ निवडणुकीच्या निमित्ताने केल्या आहेत; असा प्रचार लाडक्या बहिणींमध्ये देखील पोहोचलेला आहे. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये निर्णयाचं रेकॉर्ड करणाऱ्या शिंदे, फडणवीस, पवार मंत्रिमंडळाला कोणत्याही निर्णयाचा निवडणुकीत थेट फायदा होईल, असं कोणत्याही निरीक्षकाला किंवा तज्ञाला वाटत नाही. हाच, महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा बिंदू आहे आणि या बिंदूवरूनच महाराष्ट्राच्या निवडणुकीची दिशा ठरेल.

COMMENTS