जालना : येणार्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद निवडणुकीतून दाखवून देणार आहे. मराठा आरक्षण मागतो म्हणून मी जातीयवादी नाही, कारण आम्हाला श
जालना : येणार्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद निवडणुकीतून दाखवून देणार आहे. मराठा आरक्षण मागतो म्हणून मी जातीयवादी नाही, कारण आम्हाला शेतकरी, मुस्लिम, गोरगरीब ओबीसींचे, अलुतेदार बलुतेदार यांचे सर्वांचे काम करायचे आहे. हे राज्य कोणा एका जातीचे नाही, आपल्याला सर्वांना मिळून काम करायचे आहे, त्यामुळेच या निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ करणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. गुरूवारी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत बुधवारी मध्यरात्री मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. जरांगे म्हणाले की, इच्छुक उमेदवार यांच्या सोबत चर्चा आहे. मुलाखत होणार नाही. ज्यावेळी पाडायचे की लढायच हे ठरेल, तेव्हा बाकीच्या बाबी ठरतील. आज फक्त चर्चा होणे आवश्यक आहे. इथे येणारे इच्छुक उद्याचे भविष्य आहेत. माझ्या समाजासाठी आजची चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर 20 तारखेला इथे 9 वाजल्यापासून 4 पर्यंत बैठक होईल. 20 तारखेला संयमात या. 20 तारखेची बैठक व्यापक आणि निर्णायक आहे. आता कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले. विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट घेतली. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, कशाच काय, चर्चा करून काय उपयोग, सरकार नाही येऊन तरी काय करायचे, निर्णय घेता ही येत नाही. ज्या वेळी करायचे होते तेव्हा केले नाही, त्यांना दोष देऊन काय उपयोग? त्यांचा मालकच भरकटला आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
भाजपकडून डॅमेज कंट्रोल रोखण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले आहे. त्यामुळे भाजपकडून डॅमेज कंटोल रोखण्यासाठी बुधवारी रात्री महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मात्र दोघांदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी, या भेटीनंतर देखील जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतल्याचे दिसून आले.
COMMENTS