पोलिस महासंचालकांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवणारा अटकेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस महासंचालकांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवणारा अटकेत

मुंबई : पोलिस महासंचालक संजय पांडे यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. महफूज

अमृतसरमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडले
पोपटराव आवटे यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
केज येथील जीवन शिक्षण उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

मुंबई : पोलिस महासंचालक संजय पांडे यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. महफूज अजीम खान असे आरोपीचे नाव आहे. बनावट अकाऊंट तयार करण्यामागे त्याचा काय उद्देश होता का, याचा तपास पोलिस करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस महासंचालक संजय पांडे यांचे मित्र अटल दुबे यांना मे महिन्यात पांडे यांच्या नावाने आणखी एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी पांडे यांना याबाबत विचारले असता हे अकाऊंट खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. कुणाची फसवणूक होऊ नये यासाठी दुबे यांनी महाराष्ट्र सायबरकडे याबाबत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता फेसबुक अकाऊंट सुरू करण्यासाठी वापरण्यात आलेला आयपी अॅड्रेस, मोबाइल क्रमांक, युजर आयडी तसेच इतर तांत्रिक पुरावे हाती लागताच सायबर पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेश येथून महफूज अजीम खान या तरुणाला ताब्यात घेतले.

COMMENTS