Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन अग्निवीरांचा तोफेचा बॉम्बगोळा फुटल्याने मृत्यू

नाशिक : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाते. याच प्रशिक्षण दरम्यानफायरिंग करत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फो

महेंद्रसिंग धोनी अजूनही मॅच फिनिशर आहे | LOK News 24
कोपरगाव नगरपरिषदेच्या फंडातुन एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी : स्वप्नील निखाडे
दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये हाणामारी

नाशिक : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाते. याच प्रशिक्षण दरम्यानफायरिंग करत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटात दोन अग्नीवीर जवान जखमी झाले होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. गोहिल सिंग आणि सफत शीत अशी मृत अग्नीवीर जवानांची नावे आहेत. नाशिकमध्ये अग्निवीरांच्या सरावा दरम्यान धक्कादायक घटना घडली. तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्‍चित स्थळी न जाता तो जागेवरच फुटला. यावेळी झालेल्या स्फोटात दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाला. तर एक अग्नीवीर जखमी झाला आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS