जामखेड : भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग विकास पुरस्कार हा मानाचा पुरस्कार समजला जातो. हा मानाचा पुरस्कार जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील मुळ रहिवाश
जामखेड : भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग विकास पुरस्कार हा मानाचा पुरस्कार समजला जातो. हा मानाचा पुरस्कार जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील मुळ रहिवाशी व सध्या पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले राजुशेठ देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग विकास पुरस्कार पुणे येथे देण्यात आला. राजूशेठ देशपांडे हे कल्याणी अर्थमुव्हर्स अँड कंन्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 7 आँक्टो रोजी पुणे येथे अँटो क्रीटल पिंपरी चिंचवड येथील सभागृहात आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, रविराज इंगळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पुरस्कार वितरण संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे होते. 21 व्या शतकातील एक मराठी व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून आपण भारतरत्न जे. आर.डी. टाटा यांच्या विचारांकडे वाटचाल करीत आहात. आपल्या कर्तृत्व शैलीचा गौरव व्हावा म्हणून आपणास मानाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असे राजूशेठ देशपांडे यांना प्रदान केलेल्या प्रमाणपत्रात गौरवोद्गार लिहिले आहेत. या मानाच्या पुरस्काराबद्दल माजी मंत्री तथा आ प्रा. राम शिंदे, आ विलास लांडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ,प्रा सचिन गायवळ, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, चेअरमन उद्धव हुलगुंडे, प्रविण चोरडिया, डॉ अल्ताफ शेख यांच्या सह जामखेड, पुणे येथील विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रमंडळी व नातेवाईकांकडुन राजुशेठ देशपांडे यांचे अभिनंदन केले.
COMMENTS