जीडीपीमध्ये 40 वर्षांतील सर्वाधिक घट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीडीपीमध्ये 40 वर्षांतील सर्वाधिक घट

गेल्या जवळपास दीड वर्षांपासून जगभरात कोरोना थैमान घातले आहे. कोरोना विषाणुमुळे आलेल्या निर्बंधांमुळे जागतिक अर्थचक्राचा गाडा संथ गतीने पुढे जात आहे.

भोजपुरी स्टार पवन सिंहच्या कार्यक्रमात राडा
केरळमध्ये मान्सूनचे आगमन
FILMY MASALA : पुष्पा या चित्रपटातील दृतीय गाण प्रदर्शित.. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

नवीदिल्लीः गेल्या जवळपास दीड वर्षांपासून जगभरात कोरोना थैमान घातले आहे. कोरोना विषाणुमुळे आलेल्या निर्बंधांमुळे जागतिक अर्थचक्राचा गाडा संथ गतीने पुढे जात आहे. अशात या महामारीचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडली आहे. भारताच्या जीडीपीमध्ये 2021 आर्थिक वर्षात -7.3 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या चार दशकांतील हा सर्वाधिक कमी आकडा आहे. 2019-20 आर्थिक वर्षात जीडीपी वाढ चार टक्के होती. केंद्र सरकारने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

    गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा अर्थव्यवस्थेला मोठा दणका बसला होता. देशात तांत्रिकदृष्ट्या मंदी आली होती. सलग दोन तिमाही एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर या कालावधी भारताच्या जीडीपीमध्ये घसरण बघायला मिळाली होती. जूनच्या तिमाहीत तर जीडीपी तब्बल 24 टक्के घसरला होता. त्यानंतर डिसेंबरच्या तिमाहीत 0.4 टक्क्यांची किरकोळ वाढ बघायला मिळाली होती. अनेक संस्थांनी जीडीपीमध्ये मोठी घसरण बघायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. दोन तिमाहीमध्ये झालेल्या घसरणीमुळे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये घसरण होईल असे म्हटले होते. केंद्र सरकारने अंदाज व्यक्त करताना म्हटले होते, की आर्थिक वर्षात 2021-21 मध्ये जीडीपीमध्ये आठ टक्के घसरण होऊ शकते, तर पतमापन संस्था ’इक्रा’ने असा अंदाज व्यक्त केला होता, की पूर्ण आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घसरण होईल. मार्चच्या तिमाहीत जीडीपीमध्ये दोन टक्के वाढ होईल, असेही सांगण्यात आले होते.

COMMENTS