Homeताज्या बातम्यादेश

शाळा व्यवस्थापकाने दिला दोन विद्यार्थ्यांचा नरबळी

हाथरस : उत्तरप्रदेशातील हाथरस विविध घटनांनी सातत्याने चर्चेत असतांनाच याच हाथरसमध्ये दोन विद्यार्थ्यांचा नरबळी दिल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे

नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त
डाळींचे भाव कडाडले ; तूरडाळ 15 रूपयांनी महाग
पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव द्या

हाथरस : उत्तरप्रदेशातील हाथरस विविध घटनांनी सातत्याने चर्चेत असतांनाच याच हाथरसमध्ये दोन विद्यार्थ्यांचा नरबळी दिल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. हाथरस येथील निवासी शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापक शिक्षक व त्याच्या तांत्रिक वडिलांनी इयत्ता दुसरीच्या दोन विद्यार्थ्यांचा नरबळी दिला. ही घटना उघड झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी व्यवस्थापक शिक्षक, त्याचे तांत्रिक वडिलांसह पाच जणांना अटक केली.
कोतवाली साहपाऊ भागातील रासगनवा गावात चालणार्‍या डीएल पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील 11 वर्षीय कृतार्थ कुशवाह रहिवासी तुरसैन याचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सदाबाद हिमांशू माथूर यांनी सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापकाचे वडील जशोधन सिंग. दिनेश बघेल हे तांत्रिक विधी करतात. वडिलांसह शाळेच्या व्यवस्थापकाने शाळेच्या प्रगतीसाठी मुलाचा बळी देण्याचा कट आखला. गेल्या रविवारी रात्री शाळेच्या आतील हॉलमध्ये झोपलेल्या कृतार्थ या विद्यार्थ्यांचा गळा आवळून बळी देण्यात आला. यानंतर व्यवस्थापक आपल्या गाडीतून विद्यार्थ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलाचा मृतदेह शाळा व्यवस्थापकाच्या गाडीत सापडला. मुलाच्या हत्येनंतर शाळेच्या व्यवस्थापनाने मुलाच्या घरी फोन करून कृतार्थ आजारी असल्याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय शाळेत पोहोचले असता त्यांना कृतार्थ सापडला नाही. वसतिगृह संचालक दिनेश बघेल यांना विद्यार्थ्यांच्या उपचाराबद्दल विचारले असता त्यांनी त्यांची दिशाभूल केली. कृतार्थला उपचारासाठी घेऊन गेल्याचे ते सांगत राहिले. काही वेळाने या लोकांनी दिनेश बघेलला त्याच्या कारसह सादाबादजवळ पकडले.

COMMENTS