मुंबई ः बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर केल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार बदलापूरमध्ये होवू देणार नसल्याचा पवित्रा नागरिका

मुंबई ः बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर केल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार बदलापूरमध्ये होवू देणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. यासंदर्भात अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दफन करण्यासाठी सोमवार पर्यंत जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मृतदेह दफन करण्यासाठी आम्ही जागा शोधत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या वतीने सोमवारपर्यंत जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात ठाणे पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलेल्या बदलापूर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणीसाठी मंजूर केली होती. वडिलांनी दाखल केलेल्या अंतरिम अर्जात म्हटले होते की, स्थानिक संस्थेचे सीईओ त्यांच्या मुलाच्या दफनविधीसाठी जमीन देत नाहीत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि मिलिंद साठे यांच्या न्याय पीठासमोर आज दुपारी या याचिकेवर सुनावणी झाली. यात न्यायालयाने सोमवारपर्यंत दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
COMMENTS