Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोटच्या मुलांचा खून करणार्‍या कर्जतमधील बापाला जन्मठेपेची शिक्षा

कर्जत ः आपल्या चिमुकल्या दोन मुलांना विहिरीत फेकून देऊन त्यांचा खून केल्याप्रकरणी कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली

अकरा गावातील कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
जामखेडमध्ये बंदला शंभर टक्के प्रतिसाद
दृष्काळसदृष्य परिस्थितीचे सावट जाऊन भरपूर पाऊस होऊ दे.

कर्जत ः आपल्या चिमुकल्या दोन मुलांना विहिरीत फेकून देऊन त्यांचा खून केल्याप्रकरणी कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. निष्पाप मुलांचा जीव घेणार्‍या नराधम बापाला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील शितल गोकुळ क्षीरसागर यांनी फिर्याद दिली की, त्यांचा पती गोकुळ जयराम क्षीरसागर यांच्यासोबत घरगुती कारणावरून कायम वाद होत होता. 8 वर्षांपूर्वी विवाह झाल्यापासून हे वाद सुरूच होते. दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजेनंतर त्यांचे पती गोकुळ क्षिरसागर हे ऋतुजा गोकुळ क्षीरसागर, वय : 8 वर्षे व वेदांत गोकुळ क्षीरसागर, वय : 4 वर्षे या दोघांना गावातून कटींग करुन आणतो असे सांगून घरातून घेऊन गेले. त्यानंतर थोड्या वेळात शितल गोकुळ क्षिरसागर यांना त्यांच्या दोन्ही मुलांचे मृतदेह घराजवळील शेतातील विहीरीतील पाण्यात आढळून आले. त्यांनी त्यांचे पती गोकुळ जयराम क्षीरसागर यानेच दोन्ही मुलांना विहीरीतील पाण्यात फेकून देऊन त्यांचा खून केला असल्याबाबतचा कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार प्रविण अंधारे, अमित बरडे, राणी व्यवहारे यांनी आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्याचा सखोल तपास करुन मुदतीमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला. या खटल्यात सरकारी वकिल म्हणून श्री. केसकर यांनी व पैरवी म्हणून कर्जत पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदार आशा खामकर यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये श्रीगोंदा यांच्या न्यायालयासमोर दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद होऊन 25 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयाने गुन्ह्यातील आरोपी गोकुळ जयराम क्षीरसागर, रा. आळसुंदे, ता. कर्जत यास स्वतःची दोन्ही मुलांचा विहिरीतील पाण्यात फेकून देत खून केल्याने दोषी धरत जन्मठेप व 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

COMMENTS