महाराष्ट्र राज्याची स्थापना आजपावेतो अनेकवेळेस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र कधीही महाराष्ट्राने इतकी अटीतटीची स्पर्धा अनुभवली नव्हती.
महाराष्ट्र राज्याची स्थापना आजपावेतो अनेकवेळेस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र कधीही महाराष्ट्राने इतकी अटीतटीची स्पर्धा अनुभवली नव्हती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच रणधुमाळीचा धुराळा उडतांना दिसून येत आहे. खरंतर धुराळा शांत झाल्यानंतरच स्वच्छ दिसते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाची प्रतिमा अजूनही स्वच्छ दिसून येत नाही. महाराष्ट्रात अजून काँगे्रसच्या बड्या नेत्यांचे दौरे सुरू नसले तरी, सत्ताधारी असलेल्या भाजपचे अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचारदौरे जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीचा सामना असतांना, तिसरीकडे तिसरी आघाडीने देखील डोके वर काढले आहे, शिवाय वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढत असल्यामुळे निकाल काय येणार? याचे उत्तर आजमितीस कुणीच देवू शकत नसले तरी, धुराळा मात्र चांगलाच उडतांना दिसून येत आहे. प्रचारसभांवर सर्वच पक्षांनी जोर दिल्याचे दिसून येत आहे. महायुती सरकारने मुख्ममंत्री लाडकी बहीण योजनासारख्या महत्वाकांक्षी योजना आणत आपली लोकप्रियता वाढवली असली तरी बदलापूर आणि शिवरायाचा पुतळा कोसळल्यानंतर ही लोकप्रियता काहीश्या प्रमाणात घटली होती. मात्र एन्काउंटर प्रकरणावरून पुन्हा एकदा यामध्ये वातावरण बदलतांना दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण कधी महाविकास आघाडीकडे तर कधी महायुतीकडे झुकतांना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातील दौरे चर्चेचा विषय ठरत असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील कार्यक्रम पावसामुळे रद्द करण्याची नामुष्की ओढवली असली तरी, रणधुमाळीचा धुराळा चांगलाच उडतांना दिसून येत आहे.
त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडतांना दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या वळणावर जात आहे, याचा शोध घेण्याची खरी गरज आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे अनेक प्रयोग झालेले आहेत. त्याचप्रकारे महाविकास आघाडीने 2019 मध्ये नवा प्रयोग करत राज्यात सत्ता स्थापन केली. अर्थात ही सत्ता काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना रूचली नाही. अर्थात सर्वाधिक आमदार आपले असून, युतीला कौल असूनही शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सत्तेत दाखल झाल्यामुळे भाजपच्या तळपायाची आग मस्तकात न गेल्यास नवल नको. त्यातून पुढील राजकारण घडत गेल्या. मात्र आजमितीस महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर येवून पोहोचले आहे. त्यातून राजकारणातील खिलाडूवृत्ती केव्हाच संपली असून त्याची जागा खूनशीपणाने घेतली आहे. त्याला राजकारणातून संपवा नाहीतर तो आपल्याला संपवेल ही वृत्ती बळावत चालली आहे. त्यासाठी मग कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे एक-एक नेते तुरुंगात गेले, त्यानंतर देेेवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या अटकेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कुंभाड रचल्याचा आरोप केला. वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्य हे प्रमुख आणि पुढारलेले राज्य आहे. सर्वाधिक कर महाराष्ट्रातून केंद्राला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्रात आपल्या पक्षाची ताकद असावी, सत्ता असावी असे सर्वच पक्षाला यापूर्वी देखील वाटत आले आहे. मात्र तेव्हाची जागा आता खूनशी राजकारणाने घेतली आहे. त्यामुळे ऐन-केन प्रकारे राज्यात सत्ता हवीच, हाच मंत्र सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून गिरवला जात असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता राज्यात शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला आहे, तर अजित पवार गट राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असल्यामुळे या निवडणुकीच वरचष्मा ठेवत सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या निवडणुकीत तिसरी आघाडी, मनोज जरांगे आणि वंचित याशिवाय मनसे कोणती भूमिका घेते यावर बर्याच मतदारसंघातील विजयाचे गणित ठरणार आहे.
COMMENTS