Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टीएएस महाराष्ट्र शाखेच्‍या वतीने सिनर्जी २०२४ राष्ट्रीय परीषदेचे आयोजन 

२७ ते २९ सप्‍टेंबरदरम्‍यान नाशिकला पार पडणार परीषद

नाशिक- दी असोसिएशन ऑफ शालाकी (टीएएस) यांच्‍या पुढाकारातून व राज्‍य शाखेच्‍या वतीने 'सिनर्जी २०२४' ज्याचे ब्रीदवाक्य ' सा विद्या या विमुक्‍तये'  य

नवीन संसद आत्मनिर्भरतेची साक्ष बनेल – पंतप्रधान मोदी
231 दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात-पाय वाटप
*मोठी बातमी : दौंड शहरात शिव जनसेवा कोविड केअर सेंटर चा उदघाटन सोहळा संपन्न… | Lok News24*

नाशिक– दी असोसिएशन ऑफ शालाकी (टीएएस) यांच्‍या पुढाकारातून व राज्‍य शाखेच्‍या वतीने ‘सिनर्जी २०२४’ ज्याचे ब्रीदवाक्य ‘ सा विद्या या विमुक्‍तये’  या तीन दिवसीय परीषदेचे आयोजन नाशिकमध्ये केले आहे. परीषदेमध्ये नेत्रविकार शास्‍त्र तसेच कान-नाक घसा शास्‍त्र, व भारतीय चिकित्‍स पद्धती (आयएसएम) या वैद्यक शाखांमधील तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे.  या  परिषदेमध्ये महाराष्ट्र , गुजरात , कर्नाटक , केरळ , मध्यप्रदेश , राजस्थान , उत्तरप्रदेश ई. राज्यातून 700 पेक्षा जास्त नेत्रतज्ज्ञ सहभाग घेणार आहेत . सिनर्जी २०२४ ही १९ वी राष्ट्रीय परीषद २७, २८, आणि २९ सप्‍टेंबरला हॉटेल रॅडिसन्‍स ब्‍ल्‍यू येथे होणार आहे.

टीएएसच्‍या महाराष्ट्र राज्‍य शाखेने ही परीषद आयोजीत केली असून, त्‍यांनी परीषदेच्‍या आयोजनासाठी नाशिकची निवड केली आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके असून, आयोजन समिती सचिव या पदाची जबाबदरी डॉ.बाळकृष्ण पाटील आणि डॉ.अमोल देशमुख यांच्‍यावर आहे. अयोजन समितीच्‍या खजिनदारपदाची धूरा डॉ.संदीप निसाळ यांनी सांभाळली आहे . या परिषदेत वैद्यकीय परिसंवाद आणि चर्चासत्रामध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यक शास्रातील नवीनतम संशोधन , तंत्रज्ञान आणि आधुनिक व पारंपरिक आयुर्वेद याविषयी सविस्तर व्याख्याने तसेच आधुनिक शस्त्रक्रियांचे  प्रशिक्षणार्थींना  हस्त कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या परीषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन सहभागी डॉक्‍टरांना मिळणार आहे. परीषदेत वेगवेगळ्या शास्‍त्रोक्‍त विषयांवर चर्चासत्र, गटचर्चा, सादरीकरणांचे आयोजन केले जाणार आहे. पूर्वी केलेल्‍या शस्‍त्रक्रियांची मार्गदर्शक माहिती सादर केली जाणार आहे. काही निवडक शोधप्रबंधांचेही सादरीकरण या परीषदेच्‍या व्‍यासपीठावरुन होणार आहे. परीषदेनिमित्त उपस्‍थित तज्‍ज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी सहभागी डॉक्‍टरांना असेल. याशिवाय परीषदेनिमित्त प्रदर्शनाचे आयोजनही केले आहे. 

परीषदेसाठी दी असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्‍य शाखेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र लाहोरे, सरचिटणीस डॉ.मयुरेश कुलकर्णी, खजिनदार डॉ.मयुर लांडे, राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष डॉ.सुवर्णा गोलेचा, सरचिटणीस डॉ.संदीप निमसे, खजिनदार डॉ.प्रवीण चव्‍हाण तसेच मार्गदर्शक डॉ.वसंत भगली, डॉ.दिलीप पुराणिक, डॉ.राजेश पवार, सल्‍लागार डॉ.विवेक कानडे, डॉ.दिलीप भुसारी, डॉ. सी. के. वलवनकर , सिनर्जी समन्‍वय समितीचे डॉ.अभिजित आग्रे , डॉ.विशाल चौधरी यांची प्रमुख उपस्‍थिती राहाणार आहे. परीषदेच्या  नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्‍या गठीत केल्‍या असून, त्‍यांच्‍या माध्यमातून परीषद यशस्‍वीतेसाठी अथक  परीश्रम घेतले जात आहेत.

COMMENTS