Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची बहीण शेतात कामाला येईना !

बळीराजाव मजूर टंचाईच्या संकटात ग्रामीण भागातील वास्तव

देवळाली प्रवरा ः आधीच पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, कपाशी यासारखे निम्मे पीक पाण्यात गेले आहे.राहिलेले पीक काढण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे.

भारनियमनात दिलासा…अतिरिक्त वीज उपलब्ध
कुटुंब जिव्हाळा आणि शैक्षणिक कळवळा हेच शिक्षकांचे तपोधन ः प्राचार्य अनारसे
Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)

देवळाली प्रवरा ः आधीच पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, कपाशी यासारखे निम्मे पीक पाण्यात गेले आहे.राहिलेले पीक काढण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. परंतू  मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून सर्रास महिलांना पैसा मिळायला सुरुवात झाली आहे.त्यामुळे मुख्यमंञ्यांची लाडकी बहिण शेतात कामाला येण्यास तयार नाही.दर महा मिळणार्‍या पैशामुळे शेतमजूर महिलांनी शेतीकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे. परिणामी ऐन हंगामात बळीराजाला मजूर टंचाईच्या संकाटाच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे पाहावयास मिळत आहेत.
          ग्रामीण भागातील भुईमूग पिके काढण्यासाठी महिलांची एक टोळी कार्यरत असायची. वाढत्या महागाईमुळे मजुरीचे दर वाढले आहेतच. शिवाय अलीकडच्या काही वर्षांत स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने महिला मजूर संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. आणि त्यात भर म्हणून आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना असित्वात आली.आणि महिलांना याद्वारे चांगले पैसे घर बसल्या मिळायला सुरुवात झाली आहे. विशेषतः आता त्यांना मिळणार्‍या पेन्शन रकमेत वाढ करण्याच्या घोषणा सरकार करत आहे. नेमके याचमुळे आता ज्या शेतमजूर महिला होत्या. त्यांनी देखील मजूरीकडे पाठ फिरवली सुरवात केली आहे. वास्तविक ज्या बळीराजाच्या जीवावर भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे. त्याला मात्र एक ना अनेक संकटातून मार्ग काढावा लागत आहे. कर्जबाजारीपणातून  डोके वर काढायला बळीराजाला काही केल्या उसंत मिळेना.अशातच यंदाच्या खरिपात निसर्गाच्या चक्रव्यूहातून निम्मे पिके कशी तरी वाचलीत.पण ती काढण्यासाठी मजूर टंचाईचे संकट उभे राहिले आहे. परिणामी बळीराजा दुहेरी पेचात अडकला आहे. बळीराजाला आता शेतीबरोबर शेतमजुरी करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येवू लागले आहे. ही खेदाची बाब आहे. यासंदर्भात टाकळीमिया ता.राहुरी येथील शेतकरी रविंद्र मोरे यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या शेतात भुईमूग, सोयाबीन, कपाशी खुपणी व वेचणी सुरुवात करायची आहे. परंतु गेली चार दिवसा पासुन  मजुराचा शोध घेतोय पण मजुरच मिळत नाही. शेवटी घरातील पत्नीने या कामाला सुरुवात  केली आहे. मजूर टंचाईचा मोठा फटका शेतीला बसत आहे.

शेतकरी कुटुंब बनले शेतमजूर! –सोयाबीन, भुईमूग, कपाशी खुरपणी व वेचणी  पिके काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु ग्रामीण भागात ही पिके काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. आणि याकामी पुरुष टोळीकडून अव्वाच्या सव्वा दर शेतकर्‍यांना सांगितला जातो आहे. त्यामुळे बहुधा सर्रास ठिकाणी शेतकरी पती, पत्नीसह कुटुंबातील सदस्य शेतमजुरीचे काम करत आहेत.

COMMENTS