Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तात्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत जाहीर करा

संभाजी ब्रिगेडची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

श्रीगोंदा : गेल्या दोन तीन दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात सतत अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये मोठ्या प्

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश,रखडलेल्या कामाला सुरुवात
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल
जायकवाडीत पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून शासनास सादर करावा

श्रीगोंदा : गेल्या दोन तीन दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात सतत अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून पावसामुळे शेतातील माती देखील वाहून गेल्याने शेती नापीक बनली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या घरांची पडझड झाली आहे. अनेक भागांत छोटे छोटे रस्ते व पुल देखील वाहून गेल्यामुळे संपर्क देखील तुटला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनाचे करुन नुकसानीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर पाठवून शेतकर्‍यांना नुकसानीची आर्थिक भरपाई जाहीर करावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडकडून तहसीलदार यांना देण्यात आले.
    यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज, तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे, उपाध्यक्ष दिलीप लबडे, कार्याध्यक्ष गोरख घोडके, शहराध्यक्ष विनोद मेहत्रे ई पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असून निवडणुकीपेक्षा शेतकर्‍यांचा प्रश्‍न जास्त गंभीर आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड या विषयात तीव्र आंदोल करेल.
इंजि. शामभाऊ जरे (तालुकाध्यक्ष)

COMMENTS