जामखेड ः शाळा काँलेजमधील विद्यार्थ्यांना येणार्या अडचणीसाठी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी
जामखेड ः शाळा काँलेजमधील विद्यार्थ्यांना येणार्या अडचणीसाठी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी शिक्षक आणि समाजाकडून मिळालेले ज्ञान याचा योग्य वापर करून जीवनात यशस्वी व्हावे असा मोलाचा सल्ला कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आ रोहित पवार यांनी विद्यार्थ्याना दिला. यापुढे श्री नागेश संकुलात सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावे म्हणून भव्य दिव्य सांस्कृतिक सभागृह उभारू असेही त्यांनी बोलताना सांगितले.
शाळेत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य व कर्जत जामखेड लोकप्रिय आमदार रोहित पवार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, रयत बँकेचे संचालक व्याख्याते प्रशांत खामकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (रा कॉ शरद पवार गट) राजेंद्र कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी जिप सदस्य दत्तात्रय वारे, संचालक सुधीर राळेभात, वैजीनाथ पोले, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, कोकाटे व्ही के, संजय हजारे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, बापूसाहेब कार्ले,कॅप्टन लक्ष्मण भोरे, शिवाजीराव ढाळे, सागर कोल्हे, कुंडल राळेभात, सचिन शिंदे, प्रवीण उगले, संतोष ससाणे, प्रा कैलास वायकर, विनोद सासवडकर, उमर कुरेशी, रघुनाथ मोहळकर, साळुंके बी एस, शिंदे बी एस, मयुर भोसले, मोहन यादव, सुग्रीव ठाकरे, राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, रामहरी गोपाळघरे, अशोक पठाडे, मंगेश आजबे, प्रकाश काळे, सिद्धेश्वर लटके, कृष्णाराजे चव्हाण, प्रश्नात वारे,अमोल गिरमे, कुंडलिक राळेभात, नय्यूम शेख, भारत काकडे, दत्ता डिसले, संतोष शिंदे, महेंद्र राळेभात, महेश राळेभात, काकासाहेब कोल्हे नागेश व कन्या विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना आ रोहित पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये चिकाटी ठेवून आई-वडिलांचे नाव उंचवावे. कर्मवीरांच्या विचाराप्रमाणेच आपण स्वावलंबी बनावे. यावेळी अनेक मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील मौलिक घटनांची मनोगतातून माहिती दिली.
COMMENTS