Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकीय संघर्षात कुसडगाव एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण

रोहित पवारांचा सरकारने धसका घेतला : अनिल देशमुख

जामखेड ः ज्या लोकांनी विश्‍वास ठेवला त्यांना सर्वतोपरी सेवा देण्यासाठी संघर्ष करणारा नेता रोहित पवार आहे. अनेकांचा विरोध झुकारून कुसडगाव प्रशिक्ष

जामखेड-सौताडा 548-डी राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
भाजपकडून बहुजन ओबीसी नेत्याची ताकत कमी करण्याच काम : Rohit Pawar
आ. रोहित पवारांनी केलेला विकास देखवत नसल्याने काहींना पोटशूळ : मनिषा सोनमाळी

जामखेड ः ज्या लोकांनी विश्‍वास ठेवला त्यांना सर्वतोपरी सेवा देण्यासाठी संघर्ष करणारा नेता रोहित पवार आहे. अनेकांचा विरोध झुकारून कुसडगाव प्रशिक्षण केंद्र कोणाच्या परिश्रमामुळे झाले ते जनतेला माहीत आहे. सत्ताधारी भाजपा सरकारने रोहित पवारांचा धसका घेतला आहे.त्यामुळेच त्याच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत. मात्र त्यांच्या पाठीशी तुम्ही जनता आहात. विकास नाही, रोजगार नाही दिल्लीच्या फोनवर चालू असलेल्या देवेंद्र फडणवीसचे फोडाफोडीचे राजकारण उघड्या डोळ्यांनी जनता बघत आहे. मला खोटे षडयंत्र रचत चौदा महिने जेलमध्ये ठेवले मात्र दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे तेव्हा आ रोहित पवारांच्या पाठीशी राहुन लाखोंच्या मताधिक्याने त्यांना निवडून आणा असे आवाहन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. कुसडगाव एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, दत्तात्रय वारे,संजय वराट, अमोल राळेभात, कैलास वराट,निखिल घायतडक, प्रशांत राळेभात, प्रविण उगले, आशोक पठाडे, बीलाल शेख, मंगेश आजबे,काकासाहेब कोल्हे, राजेंद्र गोरे, नय्युमभाई शेख, शरद शिंदे, गणेश हगवणे, सुर्यकांत मोरे, भानुदास बोराटे, बापुसाहेब कारले, अँड हर्षल डोके, अमोल गिरमे, प्रा राजेंद्र पवार, प्रकाश काळे,उमर कुरेशी, हरिभाऊ बेलेकर, सुनील शिंदे, बाबासाहेब मगर, आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.

सुडाचे राजकारण करू नका : आ रोहित पवार – यावेळी बोलताना आ रोहित पवार म्हणाले की, सूडाचे राजकारण करू नका आम्ही त्यांना सोडत नाही .मी भिणारा नाही भिडणारा कार्यकर्ता आहे. कर्जत जामखेड मधील जनता तुम्हीच माझी ताकद आहात. तुमच्यामुळे मी लढायला शिकलो. दिल्ली समोर झूकणार नाही असे आ रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले. दोन तास प्रशिक्षण केंद्राच्या गेटवर शेकडो कार्यकर्त्यांसह आ रोहित पवार यांनी संघर्ष करत प्रशिक्षण केंद्राच्या गेटवर फित कापुन लोकार्पण सोहळा केलाच. यावेळी रोहित पवार म्हणाले की आज जामखेडच्या जनतेच्या सहकार्याने इतिहास घडविला आहे.यावेळी केंद्रावर पोलिस, दंगल पथक, कमांडो, एसआरपी असा तगडा बंदोबस्त सरकारकडून तैनात करण्यात आला होता.पुढे बोलताना पवार म्हणाले की 2019 च्या निवडणूकपुर्वी मतदारसंघातील लोकांशी भेटल्यावर आपल्या कुटुंबातील लोकांशी भेटतोय असं वाटलं हे शरद पवार साहेबांना सांगितले तेव्हा साहेबांनी इथं आमदारकीसाठी उभा राहण्याचं आणि लोकांना कुटुंबासारख जपण्याचं सांगितले. कोरोना सारख्या आजारपणात केलेल्या सेवेची कधी जाहिरात केली नाही.

मिरजगाव आणि कुसडगावचे एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र दूसरिकडे जात असतांना आ. राम शिंदे गप्प बसले होते. या कुसडगाव केंद्रात सहा हजार पोलीस राहणार आहेत. हे राज्यभर जामखेडचे वैभव वाढविणारी बाब आहे. चार जिल्हयांना पोलीस पुरविणार्‍या या केंद्राचा जामखेडकरांना मोठा अभिमान आहे. लोकसेवेच्या ज्या भावना मला आहेत त्या तुम्हाला नाही त्याला मी काय करू. प्रशिक्षण केंद्राची सरकार नाही तर इथली मायबाप जनता मालक आहे. या मालकाला सरकार इतकी घाबरली की हजारो पोलीस इथं मला आडवायला पाठवली. तुम्ही आहात म्हणुन मी आहे.येत्या निवडणुकीत 180 आमदार येतील आणि महाविकास आघाडीचे सरकार येणार दोन महिने काय तमाशा करायचा तो करा. विकास कामाबरोबर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी, गितेबाबा, सिताराम गड अशा धार्मिक स्थळांच्या कामात अडथळा आणणार्‍या अहंकारी माणसाला लोकशाही मार्गाने थांबवण्याचे काम सर्वांनी करायचे असे आवाहन आ रोहित पवार यांनी केले. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना दत्तात्रय वारे यांनी केले तर राजेंद्र कोठारी, सुर्यकांत मोरे यांची भाषणे झाली. या संघर्षमय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.

राज्यातील एकमेव घटना असेल – एक आमदार मतदारसंघातील विकास कामाचे लोकार्पण करतांना दूसरे आमदार सत्तेतील वजनाचा उपयोग करत लोकार्पण सोहळा होऊ देत नाही. यावेळी झालेला संघर्ष राज्यातील एकमेव घटना असेल असे म्हटले तर वावगे ठरू नये.

आडवाआडवी करणारा भूमिपुत्र ? – सीआरपीएफ केंद्राचे लोकार्पण सोहळा केंद्रात आ रोहित पवार व कार्यकर्त्यांनी जाऊन करू नये यासाठी केंद्राच्या गेटवर काटेरी झाडे तोडून टाकण्यात आले होते. यावेळी हजारो संतप्त पदाधिकारी व कार्यकर्ते सीआरपीएफच्या केंद्राकडे मोठ्या संख्येने घोषणा देत गेले. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी ते काटेरी झाडे गेटवरून बाजुला सारले होते. शेतकर्‍यांच्या हितासाठी साखर कारखाना घेतला, रूग्णांच्या सेवेसाठी ग्रामीण रुग्णालयाची अद्यायावत इमारत उभी केली, बेरोजगारांना रोजगारासाठी एमआयडीसी आणली, उजनी पाणी पुरवठा योजना आणली, अशा अनेक विकास कामांत आ राम शिंदे यांनी श्रेयासाठी आडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. असे संतप्त शब्दात आरोप अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना केले. भुमिपुत्राला विकास काम आडविण्यात काय स्वारस्य आहे हेच कळत नाही. विकासाच्या वाटेवर काट्या टाकणारा विकासाच्या कामात अडथळा निर्माण करून आडवाआडवी करणारा भुमिपुत्र आहे. अशी नागरिकांमधून चर्चा ऐकायला मिळत आहे.

मूर्खांच्या मागे पळू नका –आमदार रोहित पवार ही विकास गंगा आहे. या गंगेला ओळखा. पंधराशे रूपये आपलेच आहेत त्यांच्या बापाचे नाही देत. असे सांगत रोहितला परत आमदार करा असे प्रमिलाताई वराट या आजीबाईंनी आवाहन केले.

यावेळी दोन आमदारांच्या संघर्षात अधिकार्‍यांची गळचेपी होत आहे. हे सर्वश्रुत आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोठा संघर्ष उडाला होता. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली आहे 

COMMENTS