Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरपीआयच्या कामगार आघाडी जिल्हाध्यक्षपदी खंडुजी मोरे

जामखेड ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट कामगार आघाडीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी खंडुंजी तुकाराम मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आह

भटकंती करणारांच्या पालावर झाले रक्षाबंधन ;कामरगावच्या रहिवाशांचा अनोखा उपक्रम
रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळात चर्चा
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उद्यापासून मोफत तपासणी शिबीर

जामखेड ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट कामगार आघाडीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी खंडुंजी तुकाराम मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या 3 ऑक्टोबर रोजी सातारा येथे होणार्‍या वर्धापनदिनाच्या नियोजनासाठी नुकतीच आयोजित बैठक राजश्री शाहू सहकारी बँक खेडू शिवापुर ता हवेली जिल्हा पुणे येथे संपन्न झाली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप भाऊ कांबळे, प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे प्रदेश कार्याध्यक्ष अनिलभाऊ मोरे, प्रदेश सदस्य सुनिल साळवे या प्रमुख पदाधिकारयांसह कार्यकर्ते उपस्थित होते.  खंडुजी मोरे यांनी मागील काळात कामगार आघाडीच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी प्रमाणिक काम केले. तरी कोणीही गैरसमज पसरवू नये कारण खंडोजी मोरे यांची नियुक्ती अधिकृत असून ती सर्वानुमते करण्यात आली आहे. फक्त पद घेऊन बसणार्‍या पदाधिकार्‍यांना पदमुक्त करून नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर बैठकित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीत मोठे बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या निवडीबद्दल खंडुजी मोरे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS