Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरनंतरचा निर्णय नुकसानकारक : बाळासाहेब कोर्‍हाळे

कर्जत : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व साखर उद्योग क्षेत्रातील समितीची यावर्षीच्या गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात सोमवारी बैठक झाली. त्यामध्ये 15

अमृतसागर दूध संघाचे संचालक बबनराव चौधरी यांचे निधन
आंब्याची रोपे तसेच ट्री गार्ड वारी ग्रामपंचायतीला सुपूर्त
वसंतराव शिंदे यांनी पाटबंधारे खात्याला प्रामाणिक कामातून प्रतिष्ठा मिळवून दिली : आमदार लहू कानडे

कर्जत : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व साखर उद्योग क्षेत्रातील समितीची यावर्षीच्या गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात सोमवारी बैठक झाली. त्यामध्ये 15 नोव्हेंबरनंतर गाळप सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. हा निर्णय शासन व कारखानदार यांच्या सोयीचा असला तरी ऊस उत्पादकांच्या अर्थकारणासाठी अतिशय घातक व नुकसानकारक ठरणारा आहे, असे कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील ऊस उत्पादक शेतकरी बाळासाहेब कोर्‍हाळे यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे, मागील वर्षी 1 नोव्हेंबर ही तारीख ठरविण्यात आली होती, तेव्हा सुरुवातीचे दहा ते पंधरा दिवस कारखाना रुटींग स्टेपला येण्यात गेले. नंतर आडसाली व ऑक्टोबर नोदींचा ऊस गाळपास जानेवारी संपला. मग यावर्षी परत पंधरा दिवस उशिराने कारखाने सुरू झाल्यास नोव्हेंबर महिना असा तसाच जाणार आहे. खरी सुरुवात डिसेंबरला होणार तर सर्वात जास्त ऑक्टोबरमध्ये नोंदवलेला फेब्रुवारीत आणि नोव्हेंबरमध्ये नोंदवलेला मार्चमध्ये ऊस गाळपास जाईल. म्हणजे चौदा ते पंधरा महिने ऊस गाळपाविना राहणार यात शंका नाही. यातून कारखानदारांना रिकव्हरी भरपूर मिळाली तरी ऊस उत्पादकांच्या उसाच्या वजनाचे काय? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 15 महिन्यांचे पीक शेतकर्‍यांना परवडेल का ? खोडवा काढून इतर हंगामी पीक बुडणार ते नुकसान वेगळेच. त्यामुळे हा निर्णय शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक असा आहे. तरीही त्यावर बोलायला कोणी तयार नाही हे चिंताजनक आहे, असेही कोर्‍हाळे यांनी म्हटले आहे.

COMMENTS