Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभारीत रविवारी मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबीर

डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे व्याख्यान

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील राघवेश्‍वर जागृत देवस्थान कुंभारी व श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर, नाशिक आणि मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस

Ahmednagar : अवास्तव करवाढी विरोधात विविध संघटनांचे धरणे आंदोलन I LOK News 24
नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
खर्डा दसरा महोत्सवाला आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील राघवेश्‍वर जागृत देवस्थान कुंभारी व श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर, नाशिक आणि मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राघवेश्‍वर मंदिराचे मठाधिपती राघवेश्‍वरानंदगिरीजी महाराज यांनी दिली.
हे शिबीर कुंभारी येथील राघवेश्‍वर जागृत देवस्थान येथे रविवार 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 3  वाजेपर्यंत चालू राहणार आहे. यावेळी नाशिक येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध तज्ञ हृदयरोग तज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी नशिक व मनोज  चोपडा नाशिक यांचे व्याख्यान व मार्गदर्शन, तपासणी 10 वाजता होणार आहे. या शिबिरासाठी डॉ. कुणाल निकम, डॉ. विजय साळुंके, डॉ. विजय गोडगे, डॉ. प्रथमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. या शिबिरात ब्लड प्रेशर. रक्तातील साखरेचे प्रमाण, गरज भासल्यास ई. सी. जी. स्त्रियांचे आजार तपासणी, हाडांचे आजार व तपासणी, मधुमेह निदान करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी 88066 35560 व 99212 20280 यांच्याशी संपर्क साधावा. आपली नाव नोंदणी 90963 24794 या नंबर वर करावा. असे आव्हान डॉ. विजय गोडगे यांनी केले.

COMMENTS