Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईच्या स्मृतीदिनी मोफत रुग्ण सेवा देणारे डॉ. विजय काळे

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ. विजय दादाहारी काळे हे सर्व परिचित असून जवळ पासच्या 5 ते 7 गावाना ते आपली अविरतपणे वैद्यकीय

भातकुडगाव फाटा परिसरातील रेडी नदीवरून गाडी गेली वाहून
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू
पोखरणांचे कॉल रेकॉर्ड व बँक स्टेटमेंट तपासण्याची मागणी

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ. विजय दादाहारी काळे हे सर्व परिचित असून जवळ पासच्या 5 ते 7 गावाना ते आपली अविरतपणे वैद्यकीय सेवा देत असतात ते 10 वर्षाचे असताना त्यांचा वडिलांचे निधन झाल्यानंतर डॉ. काळेच्या आई छबूबाई दादाहरी काळे यांनी काबाड कष्ट करत सर्व भावंडाना शिकवत स्वतःच्या पायावर उभे केले होते.या कामी त्यांना डॉ. काळे यांच्या आत्या कमल भास्कर कदम व मावशी शोभा सूर्यभान काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 19 वर्षांपूर्वी आईचे निधन झाल्यानंतर डॉ. काळे यांचे सेवानिवृत्त मोठे बंधू बाळासाहेब काळे, बहीण शिक्षिका आकांक्षा वाघ तसेच शेतकरी बंधू संजय काळे या संपूर्ण काळे कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता.
  या दुःखातून सावरत डॉ. काळे यांनी आई च्या निधनानंतर आपण देखील समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपल्या शिंगणापूर येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये आईच्या पुण्यतिथी दिनी दिवसभर येणार्‍या सर्व रुग्णाची मोफत तपासणी करत त्यांना आरोग्यविषयक योग्य ते मार्गदर्शन करत आहे. या रुग्णसेवेच सेवेचे हे डॉ. विजय काळे यांचे 19 वे वर्षे असून मंगळवार 24 सप्टेंबर रोजी आपल्या आईच्या पुण्यतिथी दिनी साधारणपणे 60 पेक्षा अधिक रुग्णाची मोफत तपासणी करत आपल्या आई च्या आठवणीना उजाळा दिला आहे.डॉ विजय काळे हे शिंगणापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच असून त्यांना या उपक्रमास  त्यांच्या पत्नी शिंगणापूर ग्रामपंचायत माजी सदस्या राजश्री काळे यांचे देखील मोलाचे सहकार्य असते. गेल्या 19 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या आई च्या पुण्यतिथी दिनी मोफत रुग्ण तपासणी या स्तुत्य उपक्रमाचे,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बीपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या सह ग्रामस्थ आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आदिनी कौतुक केले आहे. आजच्या महागाई च्या दुनियेत डॉ काळे कडून वर्षातील एक दिवस तरी आजारपणात रुग्णांना सहकार्य लाभते ही कौतुकास्पद बाबच म्हणावी लागेल. तसेच आईच्या स्मृती प्रित्यर्थ नेहमीच दर मंगळवारी  ज्येष्ठ नागरिकांची मोफत रुग्ण तपासणी व उपचार देखील ते करत असतात  हे शिबीर यशस्वीतेसाठी वैरागिनाथ मेडिकलचे दत्तात्रय चव्हाण, तुषार साळवे व नवनाथ कुर्‍हे यांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS