Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिचड पिता-पुत्र हाती घेणार तुतारी ?

सिल्वर ओकवर घेतली खा. शरद पवारांची भेट

मुंबई ः विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच बंडखोरीचे वारे जोमाने वाहतांना दिसून येत आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्

स्वस्तात सोने देणार अखेर पोलिसांनी केले गजाआड
महाजनकोची पत घसरली!
पुणेकरांना आता गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा

मुंबई ः विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच बंडखोरीचे वारे जोमाने वाहतांना दिसून येत आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी बुधवारी सिल्वर ओकवर खासदार शरद पवारांची भेट घेतल्यामुळे पिचड पिता-पुत्र तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा रंगतांना दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते लवकरच घरवापसी करणार असल्याचे बोलले जात आहे. सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. पण, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अकोले विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवार यांची यापूर्वी अनेकदा भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2019 मध्ये मधुकर पिचड आणि त्यांचे माजी आमदार वैभव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत वैभवचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे किरण लहामटे विजयी झाले. मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2019 मध्ये किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यांना अकोले विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादी-सपामध्ये गेल्यास अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलू शकते. भाजपसाठी हा मोठा धक्का असू शकतो.

COMMENTS