Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादग्रस्त घोषणा दिल्याने दोन गटांविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे ः समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या व भाजप नेते नीतेश राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी दोन गटांविरुद्ध खडकी आणि स्वारग

तुम्हाला कायदा राबवण्यासाठी निवडून दिले तो राबवा ,आरत्या काय करत बसलात
राज ठाकरेंचे विचार ऋतूप्रमाणे बदलतात : गुलाबराव पाटील | LOK News 24
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

पुणे ः समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या व भाजप नेते नीतेश राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी दोन गटांविरुद्ध खडकी आणि स्वारगेट पोलिसठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. खडकी बाजार आणि स्वारगेट पोलिस स्टेशन परिसरात या घटना घडल्या आहे.

याबाबत खडकी पोलिसांकडून आसनीन माजीद कुरेशी (वय 20) आफान रियाज चौधरी (वय 21), कामरान इसाक अन्सारी (वय 19) , आरसलान महरुफ चौधरी (वय 22) या आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाम नंदाराम काची (वय 49, रा. गाडी अड्डा, खडकी बाजार) यांनी तक्रार दिली आहे. मौलाना आझाद फाऊंडेशनकडून खडकी बाजार परिसरात मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी मंडळाचे पदाधिकारी कुरेशी, चौधरी, अन्सारी आणि साथीदारांनी ‘जमुन गुस्ताके ये रसुल की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’ अशा समाजात तेढ निर्माण करणार्‍या घोषणा दिल्या. नीतेश राणे यांचाबाबत आक्षेपार्ह घोषणा देत निषेध करून त्यांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच पॅलेस्टाईन झिंदाबाद अशा घोषणा हेतुपुरस्पर देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी देण्यात आल्या. धार्मिक एकोपा टिकण्यास बाधा येईल याची जाणीव असताना देखील अशाप्रकारे घोषणा दिल्या गेल्या आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले पुढील तपास करत आहेत. 

COMMENTS