Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शर्मिला ठाकरे यांनी केले एन्काउंटरचे समर्थन

जखमी पोलिस अधिकार्‍याची भेट घेत केले पोलिसांचे कौतुक

मुंबई ः बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या एन्काउंटरमध्ये जखमी झालेल्या सहायक पोलिस नि

राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाले
 मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही  – शर्मिला ठाकरे
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई ः बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या एन्काउंटरमध्ये जखमी झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांची शर्मिला ठाकरे यांनी ज्युपिटर रुग्णालयात भेट घेतली. एक महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचे कौतुक करत आहे, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी यावेळी दिली. महिलांमध्ये सुरक्षेततची भावना निर्माण करायची असेल तर असे एन्काउंटर व्हायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मी या ठिकाणी राज ठाकरेंची पत्नी म्हणून किंवा कोणत्या राजकीय पक्षाची प्रतिनिधी म्हणून बोलत नाही. मी एक महिला म्हणून बोलत आहे. रोज इतके हिंस्त्र गुन्हे घडत आहे. नुसता बलात्कार होत नाही तर, बलात्कारानंतर वाईट पद्धतीने खून होत आहे. त्यामुळे आमच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राजकारणी, विरोधी पक्ष किंवा कोर्ट काय बोलत आहे, याबाबत मला काही पडले नाही. आज मला महिला म्हणून अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसाचे कौतुक करत आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करायची असेल, तर असे एन्काउंटर झाले पाहिजेत असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.

COMMENTS