Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्थिक शिस्तीमुळेच प्रेरणा पतसंस्था प्रगतीपथावर

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे प्रतिपादन

राहुरी ः राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेने ठेवीचे शतक पूर्ण केले असून प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी 102 कोटीवर गेल्या असून या ठेवी केव

’तनपुरे’च्या संचालकांची चौकशीचे खंडपीठाचे आदेश
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
मुळा डाव्या कालव्यातून तात्काळा आवर्तन सोडण्यात यावे ः तनपुरे

राहुरी ः राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेने ठेवीचे शतक पूर्ण केले असून प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी 102 कोटीवर गेल्या असून या ठेवी केवळ संस्था व संचालक मंडळावरील विश्‍वासामुळे व संस्थाचालक चेअरमन कोण आहेत यांच्याकडे बघूनच या ठेवी गोळा झाल्या असून प्रेरणा पतसंस्थेचा कारभार दर्शक व आर्थिक शिस्तबद्ध असल्यामुळे जिल्ह्यात प्रेरणा पतसंस्थेचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की, राहुरी तालुक्यातील शंभर टक्के स्वातंत्र्य सैनिकांपैकी चाळीस टक्के स्वातंत्र्य सैनिक गुहा गावात आहेत. त्यांच्या स्मरणार्थ गुहा गावात हॉल बांधा दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांचे तेथे फोटो लावा. गुहा गाव एकेकाळी स्वातंत्र्य सैनिकांचे केडर होते. त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांनी लाठ्या काठ्या खाऊन तुरुंगवास भोगला त्यांच्या कार्याला उजाळा द्या. अशा प्रकारच्या सूचना माजी खासदार तनपुरे यांनी सभेत मांडल्या. गुहा येथील प्रेरणा पतसंस्था व प्रेरणा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी खासदार प्रसाद तनपुरे बोलत होते यावेळी या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा पत संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते. समवेत व्यासपीठावर साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.सुधाकर कदम, उपाध्यक्ष आबासाहेब वाळुंज, मच्छिद्र हुरुळे, विष्णुपंत वर्पे, सुजित वाबळे, श्रीकांत जगधने, सरपंच अरुणा ओहोळ, शिवाजी कोळसे, द्वारकानाथ बढदे , रमेश पवार, प्रा. बबनराव झावरे प्रा. जमाल शेख अशोक उर्हे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना साई आदर्श मल्टी स्टेट च अध्यक्ष शिवाजीराव कपाळे म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यातील सहकाराचे नेतृत्व सुरेश वाबळे हे करतात. गेल्या 32 वर्षापासून संस्था सुस्थितीत असून चांगले काम करणार्‍या संस्थांकडे नागरिकांनी लक्ष द्यावे. ज्यादा व्याजदराच्या आमिषाला बळी न पडता संस्थेचे मालक-चालक कोण आहेत ते बघूनच संस्थेची व्यवहार करा अन्यथा ज्यादा व्याजाच्या अमिषा पोटी बळी पडून व्याजही नाही मुद्दल नाही अशी अवस्था होऊ देऊ नका. जिल्ह्यातील अनेक पतसंस्था चुकीचे काम केल्यामुळे अडचणीत आल्या आहेत त्यामुळे चांगल्या संस्थेशी व्यवहार करा संस्थेची पारदर्शकता व्यवहार पाहूनच ठेवी ठेवा अन्यथा पश्‍चाताप करण्याची वेळ येईल असे शिवाजीराव कपाळे यांनी उपस्थितीत सभासदांना मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. यावेळी प्रेरणा सोसायटीचे व्यवस्थापक दीपक सौदागर व प्रेरणा पतसंस्थेचे सरव्यवस्थापक गोरक्षनाथ चंद्रे यांनी अहवालांचे वाचन केले. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. या सभेप्रसंगी विशाल वाबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वेणुनाथ लांबे यांनी उपस्थित सभासद व नागरिकांच ेआभार मानले

COMMENTS