मुंबई ः मी महाराष्ट्रात असताना महाराष्ट्रीयन आणि मुस्लिमांना एक रुपयाचाही बिझनेस देणार नाही, अशी मुजोर भाषा वापरणार्या एका उत्तर भारतीय टीसीला र

मुंबई ः मी महाराष्ट्रात असताना महाराष्ट्रीयन आणि मुस्लिमांना एक रुपयाचाही बिझनेस देणार नाही, अशी मुजोर भाषा वापरणार्या एका उत्तर भारतीय टीसीला रेल्वे प्रशासनाने निलंबीत केले आहे. आशिष पांडे असे या पश्चिम रेल्वेच्या टीसीचे नाव आहे. एका माणसाशी फोनवर बोलताना मी मराठी आणि मुस्लिमांना बिझनेसच देत नाही, असे पांडे म्हणाला होता. त्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर राज्यात संताप व्यक्त झाला होता. त्याच्या या वक्तव्यामुळे परप्रांतीय आणि स्थानिक हा वाद पुन्हा पेटला असता. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे. पांडे याच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धार्मिक समुदाय आणि महाराष्ट्रीयन यांच्याबद्दल मुजोरीची भाषा वापरणार्या टीसीला निलंबित करण्यात आले, असे मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.
COMMENTS