Homeताज्या बातम्यासंपादकीय

अजित पवार अडकले महायुतीच्या चक्रव्यूहात !

राजकारणात उपयुक्तता पाहून त्या व्यक्तीचा वापर केला जातो. महायुतीमध्ये सध्या याच उपयुक्ततेचा नियम अजित पवारांना तंतोतत लागू पडतो. कारण राष्ट्रवादी

लाडक्या भावा-बहिणीत दुजाभाव का ?
हिजाब बंदीच्या निमित्ताने..
वाढते हल्ले चिंताजनक  

राजकारणात उपयुक्तता पाहून त्या व्यक्तीचा वापर केला जातो. महायुतीमध्ये सध्या याच उपयुक्ततेचा नियम अजित पवारांना तंतोतत लागू पडतो. कारण राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता अजित पवार आपल्याला नको आहे, असाच सूर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये दिसून येत आहे. खरंतर भाजपला अजित पवार हवे होते मात्र ते शरद यांच्यासह. मात्र शरद पवार यांनी स्वतंत्र बाणा दाखवत भाजपसोबत न जाण्याचा पवित्रा घेतल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. आणि लोकसभा निवडणुकीत अजित पवारांपेक्षा शरद पवार वरचढ ठरल्याने अजित पवारांची उपयुक्तता संपल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता अजित पवार महायुतीत नको, अशीच भूमिका भाजपचे आमदार घेतांना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील तसाच सूर आळवळा होता, त्यामुळे अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढावे यासाठी वातावरण निर्मिती तयार केली जात आहे. अजित पवारांना आम्ही बाहेरून पाठिंबा देवू, त्यांना मदत करू मात्र त्यांनी महायुतीमध्ये राहणे आमच्यासाठी धोक्याचे असल्याचा सूर भाजपच्या नेत्यांमधून निघत आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, महायुतीमध्ये तणाव असल्याचे दिसून येत आहे. या तणावामागे अनेक कारणे आहेत. राज्यात भाजपने अंतर्गत अनेक सर्व्हे केले, त्यानुसार भाजपच्या आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी भाजपकडून नवी रणनीती आखण्यात येत आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाहेर पडावे किंवा आम्ही म्हणूू तितक्याच जागांवर लढावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी जसे वातावरण तयार केले जात आहे, ते समजून घेण्याची खरी गरज आहे.

        भाजप, शिंदे गट विरूद्ध अजित पवार गट असा सामना रंगवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सध्या केले जात आहेत. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवाय काही दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमविरोधी वक्तव्य केले होते. त्या होणार्‍या वक्तव्याविरोधात देखील अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी केंद्रातील भाजवच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे सुतोवाच केले होते. मात्र अजित पवारांना कट्टर हिंदूत्ववादी अजेंडा मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावे असा अप्रत्यक्ष संदेशच भाजपच्या नेत्यांनी दिला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी मुस्लिमांचे लांगूलचालन करणार्‍यांनी थेट महायुतीतून बाहेर पडावे असे म्हटल्याने अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटांनी चक्रव्यूह आखल्याचे दिसून येत आहे. आणि त्या चक्रव्यूहामध्ये अजित पवार अलगद अडकत चालल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार सातत्याने महायुतीतील जागावाटप पूर्ण करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागे लागले आहे. त्यासाठी अजित पवारांनी थेट राजधानीत अनेक वेळेस वारी देखील केली. भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या भेटी घेत आपले दुखणे त्यांच्या कानावर देखील घातले, मात्र तरीही जागावाटप अंतिम टप्प्यात येतांना दिसून येत नाही. आगामी काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. कारण पुढील काही दिवसांत निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रात निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारण ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात या निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. अशावेळी आपण तयारीत असावे अशी अजित पवारांची इच्छा असल्याचे दिसून येते. मात्र महायुती त्यांच्या तयारीत चक्रव्यूह तयार केला असून तो चक्रव्यूह तोडण्यात अजित पवार यशस्वी होतील की, नाही ते आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.

COMMENTS