Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत गलांडे विद्यालय द्वितीय

श्रीरामपूर : अशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे भास्करराव गलांडे पाटील विद्यालयास मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुकास्तरीय द्वितीय

जरे हत्याकांड प्रकरण वर्ग करण्यावर 16 डिसेंबरला सुनावणी
पुणेवाडी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न 
मुख्यमंत्र्यांनी सत्तेतील दोन्ही काँग्रेसच्या आमदार-खासदारांशीही संवाद करावा

श्रीरामपूर : अशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे भास्करराव गलांडे पाटील विद्यालयास मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या विद्यालयास द्वितीय क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
या स्पर्धा परीक्षणामध्ये या विद्यालयातील पायाभूत सुविधा गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधा या निकषांवर काटेकोरपणे शासकीय समितीमार्फत या विद्यालयाचे श्रीरामपूर तालुक्यात मूल्यमापन करण्यात आले. विविध शासकीय समित्या कामकाज, शासकीय शिष्यवृत्ती योजना, निरक्षर साक्षरता प्रसार, स्वच्छता अभियान, आधुनिक ससाधनांचा वापर, प्रशस्त वर्गखोल्या व मैदान, परसबाग रचना, पर्यावरण संवर्धन अशा व इतर विभागांची योग्य कार्यवाही नियमितपणे सुरू आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक देवराम वडीतके, पर्यवेक्षक डी. व्ही.  बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, पालक यांनी या कार्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. विद्यार्थी केंद्र म्हणून ह्या सुविधा देण्याचा येथील शाळा व्यवस्थापनाचा अधिकचा प्रयत्न आहे. विद्यालयाच्या यशस्वीतेबद्दल स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे यांच्यासह संस्था पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS