अकोले ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राष्ट्रीय पोषण अभियान 2024 अंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित धमाल मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदा
अकोले ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राष्ट्रीय पोषण अभियान 2024 अंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित धमाल मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदचे माजी अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे उपस्थितीत संपन्न झाले.
कळस बुद्रुक येथील सभागृहामध्ये आयोजित अंगणवाडी च्या वतीने आयोजित या मेळाव्यास अकोले नगर पंचायत चे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सरपंच राजेंद्र गवांदे, माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, पोलिस पाटील गोपीनाथ ढगे, नामदेव निसाळ गोरख वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे महिला कल्याण विकास अधिकारी मीना चव्हाण पर्यवेक्षिका कांता गिरी, अर्चना एखंडे, सोनाली कुळधरण, सुरेखा मुतोंड, ज्योती कोकाटे आदी उपस्थित होते. सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत या अभियानांतर्गत शून्य ते सहा वयोगटातील मुले मुली व पालकांसाठी आनंद धमाल मेळाव्यात भविष्याचे झाड, जादूची गुहा, संवेदनशील पालकत्व, मेंदूचे जाळे, खेळणी, लसीकरण, उंची मोजणे, साप सीडी, तोंडात घास, सेल्फी जागा, पाण्याचा खेळ असे अनेक विविध खेळ यातून बालक हे सुदृढ होईल याची आकलन शक्ती वाढल त्याचे जीवन आनंदीदायी होईल यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रम यशस्वी कळसचे अंगणवाडी सेविका मालती गोसावी, आशा ढगे, संगीता वैराट, शांता गजे, मनीषा वाकचौरे, गोपाळे संगीता जाधव, लहानबाई गोरे, शैला आल्हाट, आदींनी प्रयत्न केले.
COMMENTS