पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ मे रोजी तत्काळ आदेश काढत रद्द केला.
पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ मे रोजी तत्काळ आदेश काढत रद्द केला. सहकार विभागाने केलेली शिफारस आणि पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत यांसह विविध आर्थिक अनियमितांवर बोट ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. ३१ मे पासून बँकेला आपले व्यवहार बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेनं पुण्यातील एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना केंद्रीय बँकेनं रद्द केला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार ही बँक विविध निकषांची पूर्तता करु शकत नाही. अनेक आर्थिक अनियमतताही असून, बँक आपल्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या हिताचा विचार करून बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देता येत नाही, आदी नियमांनुसार रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली आहे.
COMMENTS