Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवावा

कर्जत : आपल्या देशासह महाराष्ट्राच्या सर्वच भागातील बहुतांश जनतेचा उदरनिर्वाह हा शेती किंवा शेतीसंबधीत व्यवसायावर अवलंबून असतो. आज महाराष्ट्रातील असं

शहर काँग्रेस राहणार…मनपा विरोधक ;मंत्री थोरातांनी दिले संकेत, शिवसेना-राष्ट्रवादीसमोर राहणार आव्हान
पुणतांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोणाची होणार निवड ?
कापड बाजारात हातगाड्यांच्या अतिक्रमणावरून वाद व तणाव

कर्जत : आपल्या देशासह महाराष्ट्राच्या सर्वच भागातील बहुतांश जनतेचा उदरनिर्वाह हा शेती किंवा शेतीसंबधीत व्यवसायावर अवलंबून असतो. आज महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी, काही भागात ओल्या दुष्काळामुळे तर काही भागात कोरड्या दुष्काळामुळे संकटात सापडलेला दिसत आहे. बहुतांश जनतेची उपजीवीका ही फक्त शेतीवरच अवलंबून आहे त्यातही निसर्गाची साथ नसल्यामुळे तसेच शेतीमालाला रास्त भाव मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांचे कंबरडे मोडलेले आहे. या प्रश्‍नावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, अशी मागणी कर्जत तालुक्यातील खांडवी येथील प्रा. एन. एस. तापकीर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे, शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा शेतकर्‍यांसमोरचा प्रश्‍न आहे. या आणि अशा अनेक चिंता शेतकर्‍यांना भेडसावत आहे. ज्या जनतेने आपापल्या भागात लोकप्रतिनिधींना निवडून दिले मग ते लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे असोत की विरोधी पक्षाचे असोत, त्यांनी त्या-त्या भागातील सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. या विषयांमध्ये कोणीही राजकारण करू नये. शेतकर्‍यांची मते फिरले तर भल्या-भल्या लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याची ताकत या शेतकरी वर्गात आहे. अशी अनेक उदाहरणे शेतकरी जनतेने दाखवून दिलेली आहेत. ज्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांचा विरोध केला किंवा त्यांच्या विरोधात भूमिका घेतली किंवा शेतकर्‍यांना अपशब्द वापरले त्यांचे लोकप्रतिनिधित्व जनतेने नाकारलेले आहे. यापुढेही असेच घडेल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍याच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवून शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी मिळवून द्यावी. शेतकरी वर्ग नक्कीच येणार्‍या निवडणुकीत अशा कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना साथ देतील असेही तापकीर यांनी म्हटले आहे.

COMMENTS