Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुलदादा जगताप लढणार विधानसभा निवडणूक !

खा. शरद पवारांनी दिले कामाला लागण्याचे आदेश

श्रीगोंदा : माजी आमदार राहुलदादा जगताप विधानसभा लढणार नाही अशी चर्चा असताना शनिवारी श्रीगोंदा राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने माळेगांव येथे खासदार शरद

संगमनेरमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन
आर.जे.एस नर्सिंग कॉलेज मध्ये फाळणी वेदना स्मृतिदिन उत्सहात साजरा.
राहुरी फॅक्टरी परिसरात आढळला परप्रांतीय कामगाराचा मृतदेह

श्रीगोंदा : माजी आमदार राहुलदादा जगताप विधानसभा लढणार नाही अशी चर्चा असताना शनिवारी श्रीगोंदा राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने माळेगांव येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने त्यांची श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघ संघातून उमेदवारी फायनल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, खा. शरद पवारांनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश देताच श्रीगोंद्यात जल्लोषात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
    श्रीगोंदा मतदारसंघात राहुल जगताप हेच उमेदवार असतील. त्यांना कामाला लागा असे सांगत नगर जिल्ह्यातील आठ जागा राष्ट्रवादी लढणार असून त्यात श्रीगोंदा जागा ही राष्ट्रवादीचीच असल्याचे घोषित केले असल्याचा दावा शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागा अस सांगत आता आणलेली साकळाई आणि कुकडी बोगद्याचा प्रश्‍नांच निवेदन न देता हे प्रश्‍न आमदार होऊनच सोडवा असे असल्याचा दावाही शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच, मध्यंतरी संजय राऊत यांनी श्रीगोंदा मध्ये शिवसेना उमेदवारी घोषित केली होती. यावर शरद पवार यांना विचारले असता महाविकास आघाडीतील तीन पक्ष मिळवू उमेदवार ठरवणार असल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकट्याने उमेदवारी घोषित करणे बरोबर नाही असे ही शरद पवार यांनी सांगितले असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

COMMENTS