कोपरगाव शहर ः पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला व डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राहाता सांस्कृतिक व

कोपरगाव शहर ः पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला व डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राहाता सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव नक्कीच विद्यार्थ्यांच्या लुप्त कलागुणांना वाव देणारा महोत्सव ठरत असल्याचे मत नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेशआबा परजणे यांनी या महोत्सवात नामदेवराव परजणे पाटील इंग्लिश मीडियम मधील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूट राहाता व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहाता यांच्या वतीने शनिवार दिनांक 7 सप्टेंबर ते मंगळवार दि 17 सप्टेंबर या कालावधीत सहकारातून समृद्धीकडे या संकल्पनेतून साकारलेल्या राहाता सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव -2024 मध्ये राहाता व कोपरगाव तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत वेगळे कार्यक्रम नृत्य सादर करत आनंद साजरा केला होता.यात कोपरगाव येथील नामदेवराव परजणे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्यात सहभागी होत लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेश उत्सवावर नृत्य सादर करत तृतीय क्रमांक मिळविला तर या नृत्यात शाळेचा पवन विजय कापसे या विद्यार्थ्यांने लोकमान्य टिळकांची अप्रतिम भूमिका साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत नामदेवराव परजणे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल चे पवन कापसे, महाले तनिष्का, कांदळकर राधिका, परदेशी समृद्धी, रोकडे वेदिका, सुरळकर निखिल, चित्ते ईशान, पवार अनुष्का, बडोगे वैष्णवी, बडोगे कृष्णा, गीते संजना, भागवत ऋतुजा, सलगर सिद्धार्थ, शेंडगे गौरी, शेंडगे श्लोक, शेख हमदंन, दाभाडे राज, परजणे गौरव, वैद्य कार्तिक, आव्हाड समर्थ, जाधव समीक्षा या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर या सर्वांना शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका घोलप, जयश्री वाघ, ज्योती म्हस्के, मीना लावरे, वैशाली पानगव्हाणे, पूजा बाविस्कर, सुमया शेख, मीनाक्षी चव्हाण आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांना समुहनृत्यासाठी मार्गदर्शन करत घवघवीत यश संपादन करत नावलौकिक मिळविला आहे.
COMMENTS