Homeताज्या बातम्यासंपादकीय

एकनाथ शिंदे : इव्हेंट मॅनेजमेंट न करणारा एकमेव नेते !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे आजच्या काळातील सर्वात यशस्वी असे राजकारणी मानले जातील! त्यातही, त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंट नावाचा कोणताह

सीमाप्रश्न राजकारणाचे हत्यार नव्हे !
नवाब मलिकांचा बॉम्ब पवारांनी फुसका केलाय?
खेळभावनेची जागा हिंसाचाराने घेतलीय का ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे आजच्या काळातील सर्वात यशस्वी असे राजकारणी मानले जातील! त्यातही, त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंट नावाचा कोणताही प्रकार दिसला नाही. खरंतर, संघर्षमय जीवनातून त्यांनी शिवसेनेतील कारकिर्दीला सुरुवात केली. कार्य करत राहणं, हा त्यांचा त्या त्या काळातील स्थायीभाव राहिला. शिक्षण कमी असल्याने त्यांनी स्वतःला फार मोठेपणातून किंवा वैचारिक आधार म्हणून उभं केलं नाही; तर, सर्वसामान्य माणसाशी जनसंपर्क करूनच आणि त्याच्या सुखदुःखात मदत किंवा सहकार्य देण्यातून किंवा ती मिळवून देण्यातून त्यांचा कार्यकर्त्याचा प्रवास होत राहिला. नव्वदच्या च्या दशकात साधारणतः १९९७ मध्ये ठाणे महापालिकेपासून त्यांच्या राजकीय सत्ता पदाची सुरुवात होते. महाराष्ट्र विधानसभेत ते सलग चौथ्यांदा आमदार आहेत. दोन घटना त्यांच्या बाबतीत फार महत्त्वपूर्ण सांगता येतील. स्वतःच्या पक्षाची सत्ता असतानाच आणि मुख्यमंत्री, पक्षप्रमुख एकच असताना, त्यांनी पक्षात बंडखोरी केली. त्या बंडखोरी मध्ये पक्षातील सर्वाधिक आमदार आणि खासदार त्यांच्या बाजूने गेले. वास्तविक, महाराष्ट्राने तोपर्यंत ते राजकारणात असले तरी त्यांचा एक प्रभावी राजकीय व्यक्ती म्हणून असा विचार केला गेला नव्हता! परंतु, जेव्हा ४० आमदार त्यांच्या बाजूने गेले; त्यावेळी महाराष्ट्राला पहिल्यांदा वाटलं की, त्यांच्या नेतृत्वामध्ये काही वेगळेपण निश्चित असावे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होतील असा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. बंडखोरी करूनही मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास सगळ्यांच्याच मुखी देवेंद्र फडणवीस यांचं नाव होतं. 

केंद्रातील मुत्सदी खेळीने म्हणा अथवा एकनाथ शिंदे यांच्या कडून काम करून घेण्याच्या पद्धतीसाठी म्हणा, केंद्राने त्यांची अचानक मुख्यमंत्री पदावर वरणी लावली. मुख्यमंत्रीपदावर सुरुवातीला भांबावलेल्या अवस्थेत असलेले एकनाथ शिंदे, पत्रकारांच्या प्रश्नाला योग्य रितीने उत्तरही देऊ शकत नव्हते. बऱ्याच वेळा त्यांच्या बाजूला बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचा माईक आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करायचे. मुख्यमंत्री होऊनही त्यांचा आत्मविश्वास काहीसा दबलेला होता. मात्र, लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांन सात जागांवर आपले खासदार निवडून आणले आणि प्रथमच महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वशक्तीचा गुण दिसला. त्याचा परिणाम हा केंद्रातील सत्तेवरही झाला. एकाच वेळी सात खासदार निवडून आणलेले आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची वाटचाल लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या दिशेने जाताना अतिशय आत्मविश्वासपूर्वक ती बदललेली दिसते. अतिशय आत्मविश्वासाने त्यांची वाटचाल चाललेली आहे. या काळात त्यांनी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना राज्यामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी ही व्हायला लागली.  आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या शक्तीला आणि त्यांच्या नेतृत्व कुणाला दुर्लक्षित करून चालणार नाही. सर्वसाधारणपणे सर्वच राजकीय पक्षांचे नेते अलीकडच्या काळामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट वर आधारलेले आहेत. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे सध्याच्या काळात एकमेव असे नेते दिसत आहेत की, जे इव्हेंट मॅनेजमेंट शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची तर वाढवत नेत आहेत; मात्र, त्याचवेळी आपल्याकडे आलेल्या पदाला न्याय देत कसं पुढे न्यायचं, ही बाबही त्यांनी दरम्यान आत्मसात करून घेतली. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर भांबावलेल्या अवस्थेत चाळीस आमदारांना सोबत नेणारे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे दोन्ही अवस्थेत काहीशा भांबावलेल्या स्थितीत होते. परंतु, लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाला मिळवून दिलेल्या यशाने त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे उंचावला असून एका राजकीय पक्षाचे नेतृत्व म्हणून आपण आता कार्य केलं पाहिजे, या त्यांच्या विश्वासाने हा त्यांचा विश्वास नव्या पद्धतीने वाढला. या दरम्यान त्यांना शिवसेना या राजकीय पक्षाचे चिन्ह मिळाले. राजकीय पक्ष त्यांच्याकडे गेला. या सगळ्या बाबी असल्या तरी  त्यातील न्याय आणि अन्याय किती यावर आपण चर्चा न करता, आज केवळ एकमेव राजकीय नेता की जो इव्हेंट मॅनेजमेंट शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणे उभा आहे; असं त्यांचं वर्णन आपल्याला निश्चितपणे कराव लागेल!

COMMENTS