Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळा, महाविद्यालयांबाहेरील टवाळखोरांना पोलिसांचा दंडुका !

नाशिक - शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर भाईगिरी करीत टवाळखोरी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. गुरुवारी (ता. १९) पोलीस उपायुक्त

भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीला लग्झरीची धडक | LOK News 24
प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत स्टेट बँकेकडून दोन लाखांचा धनादेश प्रदान
हेमंत सोरेन यांना 5 महिन्यानंतर जामीन

नाशिक – शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर भाईगिरी करीत टवाळखोरी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. गुरुवारी (ता. १९) पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी अचानक मोहीम राबवून ९२ टवाळखोरांविरोधात कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता. १९) सदरची कारवाई करण्यात आली. परिमंडळ एकमधील पंचवटी, म्हसरुळ, आडगाव, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबईनाका व गंगापूर पाेलिसांच्या हद्दीत सकाळी साडेअकरा ते दुपारी दोनच्या दरम्यान ही विशेष मोहिम राबविली.

माेहिमेत पंचवटी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, आडगावचे सचिन खैरणार, भद्रकालीचे गजेंद्र पाटील, मुंबई नाक्याचे संताेष नरुटे, सरकारवाडाचे सुरेश आव्हाड, गंगापूरचे सुशील जुमडे, म्हसरुळचे अतुल डहाके यांनी विशेष पथकांसह अंमलदार व दामिनी पथकांनी कारवाई केली.

यात पथकांनी आपापल्या हद्दीतील शाळा, कॉलेजबाहेर अचानक भेट देत टवाळख्या करणाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून ९२ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी पोलिसांनी संबंधित शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन प्राचार्य, मुख्याध्यापकांच्या भेटही घेतली. 

पोलीस ठाणेनिहाय कारवाई

पंचवटी १०

म्हसरुळ १२

आडगाव १५

भद्रकाली १२

मुंबईनाका ९

सरकारवाडा १४

गंगापूर २०

एकूण ९२

“शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळक्या कारणाऱ्याविरोधात पोलिस कारवाई नियमित सुरू राहणार आहे. विद्यार्थी व शालेय संस्थांनीही यासंदर्भात पोलिसांकडे संपर्क साधावा. पोलीस तत्पर कारवाई करतील.”- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.

COMMENTS