Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या ध्रुव व दीक्षाची तलवारबाजीत विभागीय स्पर्धेसाठी निवड

कोपरगाव तालुका ः क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र  राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्यामार्फत संजीवनी इंग्लिश  मीडियम

प्रगतशील शेतकरी मधुकर उगले यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार मदत 
वाटेफळला पकडले पावणेदोन कोटीचे बायोडिझेल ; सोळाजणांविरुद्ध गुन्हा दाखल, 11जण जेरबंद
बेलापूर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट उत्साहात

कोपरगाव तालुका ः क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र  राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्यामार्फत संजीवनी इंग्लिश  मीडियम स्कूल, कोपरगांव येथे नुकत्याच 19 वर्षे  वयोगटांतर्गत जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांचे आयोजन केले होते. यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या ध्रुव विशाल  जैन व दिक्षा किशोर  सोनवणे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी  माहिती ज्यु. कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. विभागीय स्पर्धांसाठी पुणे, सोलापुर, पिंपरी चिंचवड व अहमदनगर जिल्ह्यातील स्पर्धक असणार आहे. यातही जिंकायचे या जिद्दीने ध्रुव व दिक्षा अधिकचा सराव क्रीडा प्रशिक्षक  प्रा. अक्षय येवले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी ध्रुव व दिक्षाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे व प्रशिक्षक  प्रा. येवले यांचेही अभिनंदन केले आहे.

COMMENTS