Homeताज्या बातम्यासंपादकीय

 ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर : समाज बदलाच्या लढ्यात पराभूत ?

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राजकीय चर्चेचा सर्वाधिक केंद्रबिंदू ठरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते  ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर

सार्वजनिक – खाजगी क्षेत्रासाठी मोदींचा रोडमॅप !
काॅंग्रेस सोबतचे शीतयुद्ध…! 
महायुती आणि महाविकास आघाडीतील साम्य !

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राजकीय चर्चेचा सर्वाधिक केंद्रबिंदू ठरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते  ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळातही चर्चेत राहिले. दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांची चर्चा मात्र, वेगवेगळ्या कारणांनी झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणूक काळात त्यांची एआय‌आय‌एम या पक्षाबरोबर युती होती. या युती पेक्षाही ते चर्चेत राहिले त्यांच्या सभेतील गर्दीचा होत जाणारा उच्चांक. त्यांच्या प्रचार सभांना इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग संबोधण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्ष निवडणुक निकालानंतर हे सिद्ध झाले की, त्यांच्या सभेला उपस्थित राहालेल्या गर्दीचे मतदानात रूपांतर झाले होते. त्यांना लोकसभा निवडणुकीत आघाडी म्हणून ४२ लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. त्यातील साडे सदोतीस लाख मते एकट्या वंचित बहुजन आघाडीचे होते. 

     नुकत्याच संपलेल्या म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कुणाशीच युती केली नाही. अर्थात, इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी त्यांच्या चर्चेच्या फेरी होत राहिल्या; मात्र, आघाडीत ते शेवटपर्यंत सामिल होऊ शकले नाहीत. याची नेमकी कारणे काय असावीत हा आजच्या दखल’चा मुद्दा नाही. परंतु, २०२४ च्या निवडणुकीत ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या लाखोंच्या सभा महाराष्ट्रात झाल्या. त्यांच्या सभांनी महाविकास आघाडी धडकी भरली होती!  राज्याच्या सात लोकसभा मतदारसंघात त्यांनी इतर पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. काही, मतदारसंघात त्यांनी घुमजाव ही केले. खासकरून सांगली मतदारसंघात. त्यांनी आण्णा शेंडगे या ओबीसी उमेदवाराला सुरूवातीला पाठिंबा देऊन, नंतर मागेही घेतला. ज्या श्रीमंत मराठांना सत्तेतून हटविण्याची भाषा  ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर करित होते; अगदी त्याच श्रीमंत मराठा उमेदवाराला थेट पाठिंबा देण्याची विरोधाभासी भूमिका त्यांनी घेतली. निवडणूक काळात त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेला आंबेडकरी जनतेने स्वीकारले नाही; हे लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले. निवडणूक काळात बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका पराभूत झाली. अर्थात, त्यांची भूमिका पराभूत करण्यात आंबेडकरी जनतेची विचार करण्याची क्षमता असणं, हेच मुख्य कारण आहे. आंबेडकरी समाज कोणत्याही विचारवंत, नेता, कार्यकर्ता या कोणाही पेक्षा आपल्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर अधिक विश्वास ठेवते. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य त्यांनी वाचून काढले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यामुळे आंबेडकरी समाज लोकशाही, संविधान आणि आरक्षण हे तीन मुद्दे धोक्यात आल्यास त्यांना सही सलामत बाहेर कसे काढायचे हे जाणते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, जो ‘वाघिणीचे दूध पितो, तो गुरगरतो’, हेच खरं.‌ मात्र, या वास्तवाला न जाणता ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी काही विचारवंत, साहित्यिक यांना आपल्या पराभवाला जबाबदार धरणं आणि त्याविरोधात आंदोलन करणं, तितकसं योग्य म्हणता येणार नाही.

     थोडक्यात म्हणायचे तर, निवडणूक काळात ॲड बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराचा झंझावात आणि त्या दरम्यान होणाऱ्या त्यांच्या प्रचार सभांना उपस्थित असलेली गर्दी मतदानात रूपांतरित का झाली नाही, हा मुद्दा चर्चेला अधिक येतो. निवडणूक प्रचार काळातील अनेक पक्षांचे हे वास्तव लक्षात घेतले तर, सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे इव्हेंट मॅनेजमेंट चा भाग बनले आहेत का? असा विचार मनात येऊन गेल्याशिवाय राहत नाही.

COMMENTS