Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनगर आरक्षणांना आदिवासी आमदारांचा विरोध

एसटी आरक्षण दिल्यास आमदारांचा राजीनाम्याचा इशारा

मुंबई ः धनगर समाजाकडून एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र या मागणीला आता आदिवासी आमदारांनी विरोध सुरू के

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर
धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
धनगर आरक्षणप्रश्‍नी राज्यस्तरावर हालचाली सुरु    

मुंबई ः धनगर समाजाकडून एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र या मागणीला आता आदिवासी आमदारांनी विरोध सुरू केला आहे. जर धनगरांना एसटी प्रवर्गाचे आरक्षण दिल्यास सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला दिला आहे. आदिवासी आमदारांच्या या भूमिकेमुळे धनगर आरक्षणाचा प्रश्‍न अधिकच पेटण्याची शक्यता आहे.
सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुर केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली. पण आता त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांनी कडाडून विरोध केला आहे. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. पण त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना एसटीतून आरक्षण दिले, तर आम्हाला काहीच उरणार नाही. त्यानंतरही सरकारने त्यांना अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर सर्वच पक्षांतील 24 आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील. मी तर तत्काळ राजीनामा देईल, असे काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांनी बुधवारी ठणकावून सांगितले आहे. या प्रकरणी त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची यांची भेट घेणार असल्याचेही सूतोवाच केले आहे.

COMMENTS