नगरला लस नसल्याने लसीकरणाला मिळाली सुट्टी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरला लस नसल्याने लसीकरणाला मिळाली सुट्टी

जिल्हा प्रशासनाकडून नगर शहरासाठी लस मिळाली नसल्याने मंगळवारी (1 जून) नगरमध्ये लसीकरण बंद राहिले.

जळीत झालेल्या वारे कुटुंबीयांना थोरातांकडून मदत
डॉ. नितीन करीर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन  
Kopardi Rape And Murder Case : कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी तहकूब

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्हा प्रशासनाकडून नगर शहरासाठी लस मिळाली नसल्याने मंगळवारी (1 जून) नगरमध्ये लसीकरण बंद राहिले. सोमवारी (31 मे) महापालिका प्रशासनाला जिल्हा प्रशासनाकडून लसीचे डोस मिळाले नाही. त्यामुळे मंगळवार एक जून रोजी अहमदनगर शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद राहिले. लसीकरणासाठी आलेले नागरिक लस नसल्याचे समजल्यावर नाराज होऊन माघारी गेले. 

मागील पंधरा दिवसांपूर्वी नगर शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. परंतु, सध्या गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजाराच्या आत आला आहे व नगर शहरातील बाधितांचा आकडाही दोन अंकी येऊ लागला आहे. त्यामुळे नगरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनावरील लस घेण्यासाठी नागरिकांकडून शहरातील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. त्यातच लसीचे डोस संपल्याने मंगळवारी नगरमधील लसीकरण बंद राहिले. लसीचे नव्याने डोस मिळाल्यानंतर लसीकरण केंद्र पूर्ववत सुरू केले जाईल, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी लस हाच एकमेव उपाय असल्याने लसीकरणासाठी नगरकर आरोग्य केंद्रावर रोज गर्दी करत आहेत. त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रेही महापालिकेने वाढवलेली आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून लसीचे डोस मर्यादित येत असल्याने नगर शहरात लसीकरणाचा गोंधळ सुरूच आहे.

COMMENTS