धाराशीव ः आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धकक्कादायक घटना गुरूवारी मध्यरात्री घड
धाराशीव ः आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धकक्कादायक घटना गुरूवारी मध्यरात्री घडली आहे. परांडा तालुक्यातील सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, शनिवारी 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परांड्यात सभा पार पडणार आहे. त्यापूर्वीच ही घटना घडली असल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे परंडा तालुक्यातील सोनारी येथे घर आहे. या घरासमोर मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षकाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक आंबी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते हे शनिवारी 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येणार आहेत. मात्र त्याच्या आदल्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा गोळीबार कोणी केला? कशातून गोळीबार झाला? हे पोलिस तपासात समोर येईल. अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन दिवसांपूर्वी मंत्री तानाजी सावंत आणि काही शेतकर्यांमध्ये बाचावाची झाली होती. तानाजी सावंत हे खंडेश्वरी प्रकल्प पूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला होता, अशी माहिती मिळाली आहे. यावेळी धनंजय सावंत यांनी शेतकर्यांना दमदाटी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर शेतकर्यांनी धनंजय सावंत आणि तानाजी सावंत यांच्याकडून धोका असल्याची भीती देखील व्यक्त केली होती. मात्र, अशातच आता धनंजय सावंत यांच्याच निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री आज धाराशीव दौर्यावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते हे आज 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येणार आहेत, मात्र त्याच्या आधीच गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार नेमकी कुणी केली, कोणत्या कारणासाठी केली, याचे कारण समोर आलेले नाही.
COMMENTS