Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज ठाकरे : आता उरलो नावापुरताच !

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे हे सतत चर्चेत राहीलेले व्यक्तिमत्व आहे. परंतु, त्यांच्या कृतीपेक्षा किंवा राजकारणापेक्षा प्रसारमाध्यमांनी

जनताच सर्वोतोपरी ! 
मृत्यूचे तांडव आणि आरोग्य व्यवस्था !
तर, जगात शांतता अशक्य…..! 

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे हे सतत चर्चेत राहीलेले व्यक्तिमत्व आहे. परंतु, त्यांच्या कृतीपेक्षा किंवा राजकारणापेक्षा प्रसारमाध्यमांनी मोठे केलेले हे नेतृत्व आहे. आजपर्यंत त्यांनी केलेलं कोणतंही आंदोलन, हे त्या आंदोलनाच्या विषयाला पूर्णत्वास नेणारं किंवा त्या आंदोलनाचा सोक्षमोक्ष करणारे कधीच राहीलं नाही. त्यांच्या राजकारणाचा पैलू गेल्या दोन-तीन निवडणुकांपासून, निवडणूक लढण्यापेक्षा कोणाचे तरी आतून समर्थक बनणं किंवा कोणावर तरी टीका, एवढ्या पुरतच मर्यादित राहिलेले आहे. त्यांच्या या राजकारणामुळे पक्ष म्हणून त्यांची स्थिती दर निवडणुका गणिक किंवा दरवर्षी  खालावत गेली. निवडणुकीच्या राजकारणाचं गमक हे जन आंदोलनाच्या शिवाय होत नाही. राज ठाकरे यांचे नेतृत्व हे जनतेशी जोडलेल्या प्रश्नांवर कधीच आंदोलन करीत नसल्याचे, महाराष्ट्रासमोर आता स्पष्ट झाले. त्यांचे आंदोलन कधी  भाषा संदर्भात, कधी प्रांत विरोधात, तर, कधी टोलविरोधात, तर, कधी भोंग्यांच्या  विरोधात, अशीच राहिलेली आहेत. जे विषय जनतेच्या मनाची पकड घेत नाही, अशा विषयांवर आंदोलन करून ते कुठल्यातरी राजकीय सत्तेला आतून मजबूत करत असतात. त्याचा पूर्ण मोबदला ते मोजून घेतात, अशी वंदता किंवा चर्चा त्यांच्याविषयी सातत्याने होत असते. २०१९ च्या निवडणुकांमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत, राज ठाकरे हे मोदी आणि पर्यायाने भाजप विरोधात उभे ठाकले होते. परंतु २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपाला म्हणजेच महायुतीला पाठिंबा दिला होता. या बिनशर्त पाठिंबाला उद्धव ठाकरे यांनी ‘बिन शर्ट’ पाठिंबा असं म्हटलं होतं.  यातच त्यांच्या राजकारणाची एका शब्दात समीक्षा केली गेली. महाराष्ट्राची जनता सत्ता परिवर्तनासाठी आणि जनहिताच्या कार्यासाठी किंवा जनता स्वतःच्या कल्याणासाठी सरकार बदलु पाहते;

परंतु, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला सत्ता बदलणं किंवा राजकीय परिवर्तन करणे हे उद्दिष्ट कधीच राहिले नाही! याउलट, काही व्यावसायिक आंदोलने उभे करून त्या माध्यमातून खंडणी वसूल करणे, यापलीकडे त्यांचा कोणताही आंदोलनात्मक पावित्रा महाराष्ट्राच्या जनतेला दिसला नाही. अर्थात, प्रसारमाध्यमं असतील आणि वरच्या जात समूहाच्या राजकीय, सामाजिक नेतृत्वाला राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व टिकून राहणं, हे फार महत्त्वाचं वाटतं. कारण, कोणत्याही राजकीय सत्तेला बदल करण्यासाठी जी मतांची विभागणी करणारी यंत्रणा लागते, त्यासाठी असे पक्ष कामाला येऊ शकतात, असं त्यांना वाटतं. परंतु, महाराष्ट्रात मनसे या पक्षाचं ज्या पद्धतीने खाली खाली आणि सतत खाली येणं होत राहिलं, त्यामागे, राज ठाकरे यांचं जनतेच्या हितासाठी नसलेलं कोणतंही आंदोलन आणि निवडणुकीच्या राजकारणात कोणाचं तरी राजकीय प्याद बनवून निवडणुकांमध्ये सहभाग घेणे किंवा निवडणूक प्रचार करणे यापलीकडे त्यांची भूमिका गेलेली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना आपलं अस्तित्व प्रभावी वक्तृत्व असतानाही मोठं करता आलं नाही. वास्तविक, त्यांनी त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून व्यंगचित्रांचा वारसा घेतला, नकलाकाराचा वारसा घेतला, परंतु, लोकांना प्रभावित कसं करावं किंवा लोकांना आपल्या बाजूने खेचून कस आणावं, हे संघटनात्मक नेतृत्व त्यांना करता आलं नाही आणि त्यांच्या काकांचा तो महत्वपूर्ण वारसा, त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग करता आला नाही. म्हणूनच त्यांच्या पक्षाला स्थापनेनंतर सुरुवातीला मिळालेल्या यशानंतर ओहोटी लागली ती लागलीच! आज, महाराष्ट्रात त्यांच अस्तित्व हे फक्त नावापुरताच उरल आहे, असं म्हणायला हरकत नाही!

COMMENTS