Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर शहरासाठी इंटरचेंज ठेवा : आमदार तांबे

संगमनेर : नाशिक पुणे इंडस्ट्रियल ग्रीन फिल्ड महामार्ग या महत्वकांशी प्रकल्पाचे काम रस्ते विकास महामंडळाने सुरू केले असून या महत्त्वपूर्ण महामार्ग

अमृतवाहिनीतील 40 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड
पुणतांबा-कोपरगाव रस्त्यावरील बाभळींची झाडे काढण्यास सुरूवात
रत्नदीपच्या डॉ. भास्कर मोरेनी जामीन अर्ज घेतला माघारी

संगमनेर : नाशिक पुणे इंडस्ट्रियल ग्रीन फिल्ड महामार्ग या महत्वकांशी प्रकल्पाचे काम रस्ते विकास महामंडळाने सुरू केले असून या महत्त्वपूर्ण महामार्गावर संगमनेर शहरासाठी इंटरचेंज ठेवावा अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी इंटरचेंज ठेवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे मागणी केली आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका व संगमनेर शहर हे विकासाचे मॉडेल ठरले आहे. याचबरोबर संगमनेर ही अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत मोठी बाजारपेठ असून नाशिक पुणे इंडस्ट्रियल ग्रीनफिल्ड महामार्गावर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करून संगमनेर शहरापर्यंत चौपदरीकरण रस्त्याची तरतूद या प्रकल्पामध्ये करावी. या ग्रीन फील्ड महामार्गामुळे नाशिक पुणे दरम्यान चांगले दळणवळण प्रस्थापित करण्याबरोबर समृद्धी महामार्ग प्रमाणे नाशिक अहमदनगर पुणे या संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. याचबरोबर औद्योगिक द्रुतगती महामार्गामुळे संगमनेर पुणे नाशिक ही शहरे अधिक चांगल्या पद्धतीने जोडली जाऊन महाराष्ट्रातील द्रुतगती महामार्गाचा खर्‍या अर्थाने सुवर्ण त्रिकोण निर्माण होणार आहे. संगमनेर शहराची कनेक्टिव्हिटी या महामार्गाला असणे अत्यंत गरजेचे असून यामुळे संगमनेर, सिन्नर, अकोले व जुन्नर या तालुक्यांना ही या कनेक्टिव्हिटी चा मोठा फायदा मिळणार आहे. तरी नव्याने होत असल्या नाशिक पुणे इंडस्ट्रियल ग्रीनफिल्ड महामार्गावर संगमनेर शहरासाठी इंटरचेंज ठेवावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

COMMENTS