Homeताज्या बातम्यादेश

ज्यो रुटचा विश्वविक्रम ; तिसऱ्या कसोटीत लंकेची बाजी

  सलामीवीर पथुम निसांकाच्या नाबाद १२७ धावांच्या जोरावर श्रीलंकेने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दि

नजरुद्दीन नायकवडी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरले
ऑलिम्पिक प्रसारणात प्रसारभारतीची नेत्रदीपक कामगिरी
Joe Root Record:जो रूट जॅक कॅलिस आणि स्टीव्ह वॉच्या विशेष क्लबमध्ये सामील  होऊन सचिन तेंडुलकर ला मागे टाकले

  सलामीवीर पथुम निसांकाच्या नाबाद १२७ धावांच्या जोरावर श्रीलंकेने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव केला. मात्र, इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. इंग्लंडने श्रीलंकेसमोर विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे पाहुण्या संघाने दोन गडी गमावून सहज गाठले. यासह घरच्या भूमीवर सलग सहा सामने सुरू असलेली इंग्लंडची विजयी मोहीम थांबली. 

             अशाप्रकारे श्रीलंकेने तिसऱ्यांदा परदेशी भूमीवर कसोटी सामन्यात २०० हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले आहे. परदेशात गाठलेले हे लंकेचे तिसरे सर्वोच्च लक्ष्य आहे. सन २०१९ मध्ये डरबनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेचे परदेशातील सर्वात मोठे लक्ष्य गाठले गेले. त्यावेळी लंकेने दक्षिण आफ्रिकेचा ३०४ धावा करून पराभव केला होता. याशिवाय श्रीलंकेने इंग्लिश भूमीवर कसोटी सामना जिंकण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. याआधी सन २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरचा विजय मिळवला होता. त्यावेळी लीड्समध्ये खेळलेला सामना श्रीलंकेने १०० धावांनी जिंकला होता. 

            तत्पूर्वी, लाहिरू कुमाराच्या चार विकेट्स आणि विश्व फर्नांडोचे तीन बळी याच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडचा दुसरा डाव केवळ १५६ धावांत गुंडाळला. इंग्लंडने पहिल्या डावात ६२ धावांची आघाडी घेतली होती, पण दुसऱ्या डावात त्यांची फलंदाजी पूर्णपणे ढासळली आणि त्यांना श्रीलंकेसमोर आव्हान उभे करता आले नाही.  लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या दिमुथ करुणारत्नेची विकेट लवकरच गमावली. यानंतर निसांकाने कुशल मेंडिससह डाव पुढे नेला, मात्र ३९ धावांवर गस ऍटकिन्सनने मेंडिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  त्यानंतर निसांकाला साथ देण्यासाठी अँजेलो मॅथ्यूज आला आणि दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची नाबाद भागीदारी केली आणि श्रीलंकेला सामना जिंकून दिला. निसांकाने १२४ चेंडूंच्या खेळीत १३ चौकार आणि दोन षटकार ठोकले, तर मॅथ्यूज ३२ धावा करून नाबाद परतला.

            इंग्लंडचा फलंदाज ज्यो रुट विक्रमां पाठोपाठ विक्रम मोडत आहे. आता त्याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटिसीच्या इतिहासात एक नवीन विक्रम नोंदवला आहे. रूटने भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा विक्रम मोडीत काढत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दमदार कामगिरीसाठी रुटला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. इंग्लंडने ही मालिका पहिले दोन सामने जिंकल्यामुळे २-१ अशी खिशात टाकली.

            या मालिकेत रूटने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकविले. या मालिकेतील सहा डावात त्याच्या बॅटमधून एकूण ३७५ धावा निघाल्या. या कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ दि सिरीज म्हणून निवडण्यात आले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात रूटचा हा चौथा पुरस्कार आहे. त्याच्या आधी, भारतीय फिरकीपटू आर अश्विनने डब्ल्यूटीसी मध्ये आपल्या देशासाठी तीन वेळा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता, परंतु जो रूट आता त्याच्या पुढे गेला आहे. त्याने संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि न्युझिलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन यांनाही मागे टाकले आहे.

               बेन स्टोक्स आणि केन विल्यमसन हे देखील प्रत्येकी तीन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप . मधील मालिकेत सर्वोत्तम ठरले आहेत. एकूणच रूट हा इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने ग्रॅहम गूच, अँड्र्यू स्ट्रॉस आणि जेम्स अँडरसन यांना मागे टाकले आहे. गूच, स्ट्रॉस आणि अँडरसन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून प्रत्येकी पाच वेळा मालिकावीराचा किताब पटकावला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कामिंदू मेंडिससोबत हा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार वाटून घ्यावा लागला होता. श्रीलंकेने शेवटचा सामना जिंकून काही प्रमाणात का होईना आपली पत राखली. मात्र हा पराभव इंग्लंडच्या डब्ल्यूटीसी फायनलच्या अभियानाला धक्का देणारा ठरू शकतो. याच महिन्यात इंग्लिश संघ तीन कसोटी खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून या पराभवाचा बदला ते कमजोर पाक संघावर काढून गुणतालिकेतील स्वतःची क्रमवारी सुधारू शकतात.

लेखक : – डॉ.दत्ता विघावे                        

क्रिकेट समिक्षक 

COMMENTS