Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार

खडसेंची स्पष्टोक्ती ; भाजप प्रवेश अंधातरी

जळगाव ः लोकसभा निवडणुकीपूर्वीच आपला दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते.

नंदुरबार राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचा तालुक्यात बोजवारा
रमाईनगर येथे चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मोत्सव उत्साहात

जळगाव ः लोकसभा निवडणुकीपूर्वीच आपला दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. मात्र लोकसभा निवडणूक होवूनही खडसे यांचा भाजपप्रवेश झालेला नाही. त्यामुळे सोमवारी खडसे यांनी आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच आमदार असल्याची स्पष्ट कबूली खडसे यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलतांना खडसे म्हणाले की, मी पक्ष प्रवेशासंबंधी भाजप नेतृत्वाला विनंती केली होती. पण त्यांच्याकडून अद्याप कोणताही निरोप मिळाला नाही. त्यामुळे मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचाच आमदार आहे. पक्षाने माझा राजीनामा अद्याप मंजूर केला नसून, स्वतः शरद पवार यांनीही मला आमदारकीचा राजीनामा देण्यास मनाई केली असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या एका बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आल्यामुळे ते अद्याप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातच असल्याचे स्पष्ट केले. याविषयी राजकीय वर्तुळात उलटसूलट प्रतिक्रिया उमटत असताना एकनाथ खडसेंनी स्वतः समोर येत आपण आजही राष्ट्रवादीचेच आमदार असल्याचे स्पष्ट केले. खडसे म्हणाले की, भाजप पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात मी पक्षाला विनंती केली होती. पण भाजप पक्षाकडून अद्याप कोणताही निरोप मिळालेला नाही. त्यामुळे मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य अजूनही आहे. तसेच मी माझा सदस्य पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मी दिला आहे, मात्र तो अद्याप त्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे अजूनही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे.

COMMENTS