Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आढळा खोरे बारमाहीसाठी देवठाणमध्ये सहविचार सभा उत्साहात  

अकोले ः अवर्षणग्रस्त आढळा खोरे बारमाही बागायती व समृद्ध करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून समशेरपुर नंतर आता देवठाण येथे सर्वपक्षीय सहविचार सभा घेण्य

आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला ः आरिफ शेख
राशीनमध्ये 710 किलो गोमांससह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
कोपरगावात रविवारी चैत्रोत्सवाचे आयोजन

अकोले ः अवर्षणग्रस्त आढळा खोरे बारमाही बागायती व समृद्ध करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून समशेरपुर नंतर आता देवठाण येथे सर्वपक्षीय सहविचार सभा घेण्यात झाली. बारमाही आढळा कृती समिती, जलबिरादरी व चला जाणूया नदीला या शासन उपक्रमांतर्गत देवठाण येथील ग्रामपंचायत सभागृह येथे घेण्यात आलेल्या या सभेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अकोले तालुक्यातील मुळा व प्रवरा खोर्‍याच्या तुलनेत आढळा खोरे हे जल उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून तुटीचे खोरे आहे. मुळा विभागात 26 टीएमसी तर प्रवरा विभागात 20 टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध होत असताना, आढळा खोर्‍यात मात्र अवघे जेमतेम 1 टीएमसी पाणी सिंचनासाठी व पिण्यासाठी आढळा धरणाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. सांगवी व पाडोशी येथे काही प्रमाणात पाणी साठवण्यात आले असले तरी एकंदरीतच खोर्‍यात पडणारे पर्जन्यमान कमी असल्याने शेतकर्‍यांना पिके जगवण्यासाठी पाण्याची मोठी कमतरता भासत असते. बारमाही आढळा मोहिमेच्या अंतर्गत या संपूर्ण खोर्‍याचा सविस्तर अभ्यास करून खोरे जल उपलब्धतेच्या व जल साठवणुकीच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. पक्ष, पार्ट्या, झेंडे, जात, पात बाजूला टाकत गावेच्या गावे या मोहिमेत सहभागी होत आहेत.  गावोगावी डोंगर उतारांवर समतल चर, जलसंधारण, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, कुर्‍हाडबंदी आदी उपाय करून या खोर्‍यातील भौगोलिक वातावरण पर्जन्यवृष्टीसाठी व आलेले पाणी जमिनीत मुरवून जमिनीचा जलस्तर उंचावण्यासाठी पोषक करण्याची आवश्यकता आहे. सर्वपक्षीय सहविचार सभेत वरील विषयांची सविस्तर चर्चा करण्यात आली. देवठाण येथे संपन्न झालेल्या सहविचार सभेसाठी किसान सभेचे डॉ. अजित नवले, जलबिरादरीचे विठ्ठलराव शेवाळे व जलसंपदा विभागातील माजी अधिकारी संपतराव देशमुख उपस्थित होते. बारमाही आढळा कृती समिती,  जलबिरादरी व चला जाणू या नदीला या अंतर्गत आढळा बारमाही व समृद्ध करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती वरील तिन्ही वक्त्यांनी ग्रामस्थांना दिली.

COMMENTS